Share

‘खासगी रुग्णालयातही लसीसाठी पैसे का? तिथेही मोफत लस द्या’, काँग्रेसची मोदी सरकारकडे मागणी

Published On: 

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी देशातील १८ वर्षांवरील सर्व लोकांना मोफत लस दिली जाणार असल्याची घोषणा केली होती. तर आता खासगी रुग्णालयांसाठी लसींचे दर निश्चित केलेत. आरोग्य मंत्रालयाच्या आदेशा नुसार सिरमची कोविशील्ड लस प्रति डोस जास्तीत जास्त ७८० रुपयांना, भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन १,४१० रुपयांना तर रशियाची स्पुटनिक-व्ही लस १,१४५ रुपयांपेक्षा अधिक दराने दिली जाणार नाही.

यावर काँग्रेसने खासगी रुग्णालयांतही मोफत लस देण्याची मागणी केली आहे. ‘जगातील सर्वच देश आपल्या नागरिकांना मोफत लस देत आहेत. त्यामुळे आपल्या नागरिकांनी खासगी रुग्णालयांत लसीसाठी पैसे का मोजावेत? देशातील प्रत्येकाला मोफत लस मिळावी, अशी आमची मागणी आहे’, असे काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत म्हटले आहे.

‘केंद्राने डिसेंबरपर्यंत सर्वांना लस देण्याचे आपले धोरण संसदेत स्पष्ट करावे. तसेच त्याचा रोडमॅपही सादर करावा. गरज भासल्यास त्यांनी लसीकरणासाठी संसदेकडून वाढीव आर्थिक तरतूदही करवून घ्यावी’, असे ते यावेळी मोदी सरकार ‘डेडलाइन’ नव्हे तर ‘हेडलाइन’ आधारित असल्याचा आरोप करताना म्हणाले. ‘लसीकरणाच्या मुद्यावर पंतप्रधान गाढ झोपेत होते. सुप्रीम कोर्टाने फटकारल्यानंतर ते जागे झाले. केवळ एका व्यक्तीचे अपयश व अहंकारामुळे हे सामूहिक संकट आले असून, यामुळे संपूर्ण देश त्रस्त आहे’, असे म्हणाले.

‘एप्रिलमध्ये दररोज ३० लाख लोकांना लस मिळाली. त्यानंतर मेमध्ये हा आकडा १६ लाखांवर घसरला. त्यानंतरही सरकार डिसेंबरपर्यंत सर्वांचे लसीकरण करण्याचा दावा करत आहे. हे उद्दिष्ट गाठायचे असेल तर आपल्याला दररोज किमान ८० लाख लोकांचे लसीकरण करावे लागेल. यासाठी सरकारचे धोरण व रोडमॅप काय आहे. लसींचा पुरवठा कुठून होणार? मोदी यावर काहीच बोलले नाहीत. केंद्राने या प्रकरणी लोकांना विश्वासात घेऊन लसीकरण वाढवण्याचा प्रयत्न करावा’, असेही रमेश यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!