Share

अमित देशमुखांकडून कोरोनाग्रस्त विद्यार्थ्यांना दिलासा, आरोग्य विद्यापीठाची परीक्षा नंतर देता येणार

Published On: 

नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठा मार्फत घेण्यात येणाऱ्या हिवाळी २०२० परीक्षा गुरुवार दि. १० जूनपासून सुरू होणार आहेत. या परीक्षांना बसणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह असल्याने परीक्षेस अनुपस्थित राहणाऱ्या अशा विद्यार्थ्यांसाठी विशेष परीक्षा घेण्यात येईल. अशा विद्यार्थ्यांचा अनुपस्थितीत राहिल्याबद्दल प्रयत्न (अॅटेम्प्ट) मोजण्यात येऊ नये, अशा सूचना वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी केल्या आहेत. यानुसार विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोना परिस्थितीच्या अनुषंगाने विद्यार्थी दि. १० जून२०२१ पासून सुरू होणाऱ्या विद्यापीठाच्या हिवाळी २०२० लेखी परीक्षेस कोविड-१९ आजाराचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे अनुपस्थित राहतील, अशा विद्यार्थ्यांची हिवाळी-२०२० लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा झाल्यानंतर विशेष परीक्षा घेण्यात येईल. या परीक्षेसाठी अनुपस्थित असलेल्यांचा प्रयत्न ग्राह्य धरला जाणार नाही. विशेष परीक्षेच्या तारखा स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येतील.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या वैद्यकीय परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नयेत या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी दिल्या आहेत. या अनुषंगाने प्रभारी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक येथे झालेल्या विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

या वैद्यकीय परीक्षेस बसणारे विद्यार्थी परीक्षेचे प्रवेशपत्र घेऊन कोणत्याही शासकीय रुग्णालय तसेच शासनमान्य कोविड रुग्णालयात स्वतःची आरटीपीसीआर चाचणी विनामूल्य करून घेऊ शकतात, सर्व प्रकारची काळजी घेऊनच परीक्षा घेण्यात याव्यात असेही वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता यांना कळविण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!