🕒 1 min read
नवी दिल्ली : काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी मंगळवारी कोरोना मृत्यूंच्या आकडेवारीवरून पुन्हा एकदा केंद्राला धारेवर धरले आहे. ‘केंद्राची आकडेवारी तथा स्मशान व दफनभूमींतील आकडेवारीत मोठा फरक असून, ही तफावत का?’, असा तिखट सवाल त्यांनी याप्रकरणी केंद्राला केला आहे.
प्रियंका गांधी कोरोना व्यवस्थापनाच्या मुद्यावरून सातत्याने केंद्रावर हल्ला करत आहेत. यासंबंधी त्यांनी सोशल मीडियावर ‘जबाबदार कोण?’ नामक मोहीम छेडली आहे. त्यांनी मंगळवारी एका व्हिडिओद्वारे केंद्रावर कोरोना रुग्ण व बळींची आकडेवारी दाबण्याचा आरोप केला. ‘केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने बळींच्या आकड्यांचा वापर जनजागृती व कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी न करता स्वत:च्या प्रचाराचे साधन म्हणून केला. सरकारने मृत्यूसंबंधी जारी केलेली आकडेवारी तथा स्मशान, दफनभूमी व अन्य स्त्रोतांकडून उपलब्ध झालेल्या अनधिकृत आकडेवारीत एवढी मोठी तफावत का?’, असे त्यांनी आपल्या व्हिडिओत म्हटले आहे.
कोविड से हुई मौतों के बारे में सरकार के आँकड़ों और श्मशानों-कब्रिस्तानों के आँकड़ों में इतना फर्क क्यों?
मोदी सरकार ने आँकड़ों को जागरूकता फैलाने और कोविड वायरस के फैलाव को रोकने का साधन बनाने के बजाय प्रोपागैंडा का साधन क्यों बना दिया? #ZimmedarKaun pic.twitter.com/KQVwhqJFju
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) June 8, 2021
‘जगभरातील तज्ज्ञ कोरोनावर मात करण्यासाठी त्यासंबंधित सर्वच माहिती सार्वजनिक करण्याचे पारदर्शक धोरण स्वीकारण्याची मागणी करत आहेत. त्यानंतरही केंद्र सरकार ही माहिती दडवून ठेवत आहे’, असे त्या म्हणाल्या. ‘केंद्राच्या माहितीनुसार उत्तर प्रदेशच्या ५ शहरांत ५ दिवसांत ९५० जणांचा बळी गेला. पण, स्मशानभूमी व दफनभूमींमध्ये मृतांची संख्या तब्बल ४४४२ एवढी नोंदवण्यात आली.
सरकारच्या मते गुजरातमध्ये गत १ मार्च ते १० मेपर्यंत ४२१८ जणांचा मृत्यू झाला. पण, याच कालावधीत सुमारे १ लाख २४ हजार जणांचे मृत्यू प्रमाणपत्र जारी करण्यात आले’, असेही प्रियंकांनी सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करताना म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
- मोदी सरकारकडून खासगी रुग्णालयांसाठी लसींचे दर निश्चित, जाणून घ्या किती आहे किंमत
- ‘बोठे याचे रेखा जरे यांच्याशी प्रेमसंबंध, बदनामीच्या भीतीने हत्या’, कोर्टात दोषारोप पत्र सादर
- अमित देशमुखांकडून कोरोनाग्रस्त विद्यार्थ्यांना दिलासा, आरोग्य विद्यापीठाची परीक्षा नंतर देता येणार
- संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप करणाऱ्या महिलेला ‘या’ प्रकरणात झाली अटक
- खुशखबर : ११८ नवीन आरोग्य संस्थांसाठी २२०० हून अधिक पदनिर्मितीस मान्यता
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
