Share

संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप करणाऱ्या महिलेला ‘या’ प्रकरणात झाली अटक

Published On: 

मुंबई : खासदार संजय राऊत हे आपला छळ करीत असल्याचा आरोप करणाऱ्या चित्रपट निर्मात्या डॉक्टर स्वप्ना पाटकर यांना मंगळवारी वांद्रे पोलिसांनी अटक केली. डॉक्टरेट पदवी बनावट असल्याचा आरोप पाटकर यांच्यावर आहे. पाटकर यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

समाजसेविका गुरुदीप कौर यांच्या तक्रारीवरून २६ मे रोजी पाटकरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कौर यांनी केलेल्या आरोपानुसार, एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात त्यांच्या घरी आलेल्या निनावी लिफाफ्यात कागदपत्रे मिळून आली. त्यात पाटकर यांच्या विविध कागदपत्रांचा समावेश होता. त्यातूनच पाटकर यांनी, कानपूर विद्यापीठाच्या नावाने क्लिनिकल सायकॉलॉजिस्टची बनावट पदवी मिळवल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

कानपूर विद्यापीठातील छत्रपती शाहूजी महाराज विश्व विद्यालय येथून २००९ साली नमूद विषयात पीएच.डी. केल्याचे बनावट प्रमाणपत्र तयार करून घेतले. याच प्रमाणपत्राच्या आधारे लीलावती हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट म्हणून प्रॅक्टिस करत आहेत. स्वतःला डॉक्टर असल्याचे भासवून सर्वसामान्य जनतेची फसवणूक केल्याचे कौर यांनी तक्रारीत नमूद केले आहे. त्यानुसार मंगळवारी त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली.

दरम्यान, पाटकर यांनी एका मराठी दैनिकात स्तंभलेखन केले होते. तसेच त्यांनी ‘बाळकडू’ या चित्रपटाची निर्मितीही के ली होती. मनोरुग्णांच्या समुपदेशनाशिवाय हॉटेल व्यवसायातही त्यांचा सहभाग आहे.दरम्यान, काही दिवसांपूर्वी स्वप्ना पाटकर यांनी आरोप होता की, शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’चे सह-संपादक संजय राऊत मागच्या 8 वर्षांपासून आपल्या पक्षाचे वजन वापरून शिवीगाळ करत आहेत, तसेच त्यांच्या कुटुंबीयांचा आणि नातेवाइकांचाही छळ करत आहेत. विशेष म्हणजे या बाबत त्यांनी थेट पंतप्रधान मोदींना पत्र लिहून आपली कैफियत मांडली होती.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!