Share

आता मिळावा फक्त एका मिस्ड कॉलवर LPG गॅस सिलेंडर !

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून एलपीजी सिलेंडरच्या किंमती वाढत आहेत. त्यामुळे सामान्य ग्राहकांच्या खिशाला झळ पोहचत आहे. त्यचबरोबर अनेकदा ग्राहकांना गॅस सिलेंडर संपल्यानंतर दुसरे सिलेंडर मिळे पर्यंत लागणाऱ्या वेळेची चिंता असते. मात्र आता केवळ एका मिस्ड कॉलच्या माध्यमातून गॅस सिलेंडरचे बुकिंग करू शकता. इंडेन गॅसने त्यांच्या ग्राहकांना ही सुविधा दिली आहे.

1 फेब्रुवारीपासून ही सेवा सुरू करण्यात आली आहे. तुम्ही इंडेन गॅस केवळ एक मिस्ड कॉल देऊन बुक करू शकता. याशिवाय मिस्ड कॉल करूनच तुम्हाला नवीन कनेक्शन देखील मिळेल. इंडेनच्या या सुविधेचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला केवळ तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकाचा वापर करावा लागेल. इंडेन गॅसने ही सुविधा देण्यासाठी हा 8454955555. क्रमांक जारी केला आहे. जर तुम्ही तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावरून कंपनीने जारी केलेल्या मोबाइल क्रमांकावर मिस्ड कॉल दिला तर तुमचा गॅस सिलेंडर बुक होईल.

शिवाय मिस्ड कॉलच्या माध्यमातून बुकिंग करण्याचा एक फायदा हा देखील आहे की, आयव्हीआरएस कॉल्स प्रमाणे ग्राहकांना याकरता कोणतेही अतिरिक्त शुल्क द्यावे लागत नाही. या सुविधेमुळे त्या लोकांसाठी एलपीजी गॅस बुक करणे सोपे होईल, ज्यांना IVRS कॉल दरम्यान समस्यांचा सामना करावा लागतो. त्याचप्रमाणे वृद्ध लोकांसाठी देखील ही सुविधा अत्यंत चांगली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!