🕒 1 min read
नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत या सामन्यात भारताने ३ विके्टसने विजय मिळवत इतिहास रचला. या विजयासह भारताने २-१ ही मालिका जिंकली. भारताचा हा ऑस्ट्रेलियन भूमीतील सलग दुसरा मालिका विजय आहे. याचबरोबर गेल्या ३३ वर्षांचा ऑस्ट्रेलियाचा ब्रिस्बेन कसोटीत अपराजित राहण्याचा विक्रमही भारताने खंडीत केला.
नवख्या खेळाडूंना सोबत घेत रहाणेने भारताला कसोटी मालिकेत विजय मिळवून दिला. यामुळे कर्णधार रहाणेला क्रिकेटविश्वातून कौतुक करण्यात आलं. विराटऐवजी रहाणेलाच कर्णधार करा, अशी मागणी करण्यात आली. रहाणेचं भारतात परतल्यानंतर जोरदार स्वागत करण्यात आलं.
अजिंक्य रहाणेवर होणारा कौतुकाचा वर्षाव अद्यापही थांबलेला नाही आहे. भारत-ऑस्ट्रेलिया सीरिजमध्ये लाखमोलाची कामगिरी करणाऱ्या टीम इंडियाचं आणि कसोटीदरम्यान कर्णधारपद ताकदीने सांभाळणाऱ्या अजिंक्य रहाणेचं नाव आजही सर्वांच्या तोंडी आहे. अनेक महिन्यांनी अशाप्रकारे तोडीस तोड खेळ पाहायला मिळाल्याने हे कौतुक होत आहे.
राज्यसभा सभापती आणि उपराष्ट्रपती व्यंकया नायडू यांनी देखील अजिंक्य रहाणे आणि त्याच्या चमूचं कौतुक केलं आहे. त्यांनी या विजयाबद्दल संपूर्ण टीमचं अभिनंदन केलं आहे. याआधी त्यांनी ट्वीट करून देखील टीम इंडियाचं कौतुक केलं होत.
Heartiest congratulations to Indian cricket team for the splendid victory in Brisbane Test & for retaining the Border-Gavaskar trophy. You have created history today. Your steely determination and never-say-die attitude has made the whole nation proud. Well done! #TeamIndia
— Vice-President of India (@VPIndia) January 19, 2021
महत्वाच्या बातम्या
- रोहयो घोटाळा प्रकरणात ४७० जणांना नोटीसा; २० पथकांनी केली होती चौकशी
- #Budget2021 : मूठभर भांडवलदारांच्या हातात वीज क्षेत्र सोपविण्याचे मोदी सरकारचे कारस्थान : राऊत
- #Budget2021 : अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी भरीव तरतूद नाही; भुजबळांनी व्यक्त केली तीव्र नाराजी
- पुणेकरांची घोर निराशा करणारा मोदी सरकारचा अर्थसंकल्प – कॉंग्रेस
- शेतकऱ्यांना रोखताय की संपवताय? शेतकऱ्यांना आता दिल्लीत घुसणं अवघड
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
