Share

‘दहशतवाद्यांविरोधात वापरण्याचे शस्त्र भारताच्या लोकशाहीच्या विरोधात का वापरले ?’

Published On: 

नवी दिल्ली : पेगाससच्या माध्यमातून राजकारणी तसेच पत्रकारांवर पाळत ठेवण्यात आल्याच्या प्रकरणाची सध्या चर्चा सुरु आहे. या पाळत प्रकरणावरुन मोदी सरकावर टीकेची झोड उठली आहे. विरोधकांनी वारंवार प्रश्न विचारूनही केंद्र सरकारला अद्याप समाधानकारक खुलासा करता आलेला नाहीये. संसदेच्या अधिवेशनात सध्या या मुद्द्यावरून रान पेटलेले आहे.

पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकारची कोंडी करण्यासाठी विरोधक एकवटले असून पेगॅसस या स्पायवेअर वापराच्या प्रकरणावरून हल्लाबोल केला आहे. काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. दहशतवाद्यांविरोधात वापरण्याचे शस्त्र भारताच्या लोकशाहीच्या विरोधात का वापरले ?, असा सवाल राहुल गांधींनी उपस्थित केलाय.

‘पेगॅसस स्पायवेअर हे दहशतवाद्यांविरोधात वापरायचं शस्त्र आहे. आम्हाला नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना विचारायचे आहे की तुम्ही हे शस्त्र भारताच्या लोकशाहीच्या विरोधात का वापरले ?’ असा सवाल राहुल गांधींनी उपस्थित केला. ‘विरोधकांचा आवाज संसदेत दाबला जात आहे. आमचा फक्त एकच प्रश्न आहे- भारत सरकारने पेगॅसस खरेदी केले का, हो की नाही; भारत सरकारने पेगॅससचा वापर देशाच्या नागरिकांवर पाळत ठेवण्यासाठी केला का, हो की नाही?’ असं देखील राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला विचारलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!