Share

‘मोदी २०१४ लाच अफगाणिस्तानात का नाही गेले’, चाकणकरांचा खोचक सवाल

Published On: 

मुंबई: अफगाणिस्तानची राजधानी काबुलवर रविवारी तालिबान्यांनी कब्जा मिळविला. यानंतर सर्वत्र याबाबत प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान यावर बिहारमधील भाजपचे आमदार हरीभुषण ठाकूर बचौल यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे. ठाकुर यांनी म्हटले आहे की, ज्यांना भारतात भीती वाटते, अशा लोकांनी अफगाणिस्तानात जावे. तिथे पेट्रोल आणि डिझेलही स्वस्त आहेत. दरम्यान आता यावरच राष्टवादीच्या महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी मोदींना चांगलाच टोला लगावला आहे.

‘ज्यांना स्वस्त पेट्रोल पाहिजे त्यांनी अफगाणिस्तानात जा’ असे बिनडोक सल्ले देणाऱ्या भाजप नेत्यांना त्यांनी २०१४ साली ‘बहोत हुई महंगाई की मार’ म्हणणारे नरेंद्र मोदी तेव्हाच अफगाणिस्तानात का नाही गेले? असा सवाल करत तेव्हाही तिकडे पेट्रोल डिझेल स्वस्तच होत ना, असा खोचक टोला लगावला आहे. यावरूनच आता भाजपवर सर्व स्तरातून टीका केली जात आहे.

दरम्यान यावरच भारतीय महिला कुस्तीपटू आणि सुवर्णपदक विजेता बबिता फोगाटने प्रतिक्रिया दिली होती. ‘अफगाणिस्तानजवळ स्वस्तातलं पेट्रोल होतं, स्वस्तातलं डिझेल होतं आणि स्वस्तातला कांदाही होता. पण, नरेंद्र मोदींसारखा नेता नव्हता, अशी प्रतिक्रिया दिली होती. यावरूनही बबीतावर टीका केली जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!