Share

दाशरथेंच्या ‘दिलसे’ कामावर ‘मनसे’ नाराज का?

Published On: 

औरंगाबाद : औरंगाबाद महानगर पालिका निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने खांदेपालट करत गंगापूर आणि वैजापूर विधानसभा मतदार संघाची जबाबदारी दिलीप बनकर यांच्याकडे सोपवली आहे. मात्र, पक्षाच्या या निर्णयामुळे मनसेचे जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मनसेमध्ये फुट पडण्याची शक्यता वर्तवली जातेय. दाशरथे यांच्या कामावर नाराज असल्यामुळे त्यांच्यावरील जबाबदारी कमी करण्यात आली की, अंतर्गत राजकारणामुळे यांच्याकडील जबाबदारी काढण्यात आली, हा प्रश्न यामुळे उपस्थित झालाय.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे त्यांच्या आक्रमक शैलीने ओळखले जातात. नुकतेच त्यांनी शिवसेना नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या अंगावर पत्रके फेकून त्यांनी संभाजीनगर नामकरणाचा मुद्दा चांगलाच उचचला होता. ग्रामीण भागातही शेतकऱ्यांच्या वीज तोडणी विरोधात आक्रमक होत, त्यांनी महावितरण आणि राज्य सरकार विरोधात दंड थोपटले होते. मात्र, अचानक त्यांच्याकडून दोन मतदार संघ काढून ते बनकर यांच्याकडे सोपवण्यात आले आहेत.

जुना वाद नवा भिडू : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची औरंगाबादमधील धुरा सुमीत खांबेकर यांच्या खांद्यावर होती. त्यानंतर दाशरथे यांच्या प्रवेशामुळे मनसेला मोठा आणि आक्रमक नेता मिळाला होता. मात्र, त्यामुळे खांबेकर नाराज असल्याची चर्चा होती. गेल्या काही दिवसात आक्रमक झालेल्या मनसेतील वाद मिटला असल्याचे वाटत होते. मात्र, त्याच वेळी बनकर यांच्या रुपाने हा वाद अद्याप संपला नसून पक्षांतर्गत कुरघोडी सुरूच असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!