Share

‘लग्नाला गर्दी होतेय आणि प्रशासन झोपा काढतंय’, केंद्रेकरांनी अधिकाऱ्यांना सुनावले

Published On: 

औरंगाबाद : तुमच्या जिल्ह्यात मोठमोठे विवाह सोहळे होत आहेत आणि काहीही कारवाई केली जात नाही. औरंगाबादेत तीच परिस्थिती आहे. लग्न होतात आणि सर्व झोपा काढत आहेत. मला त्यावर तत्काळ कारवाई पाहिजे असा आदेश विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकरांनी मराठवाड्यातील जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे.

औरंगाबादचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांचे एक ऑडिओ संभाषण व्हायरल होत आहे. मात्र, या क्लिपबाबत कोणतीही खात्री देण्यात आलेली नाहीये. दरम्यान, त्यात त्यांनी मराठवाड्यात कोरोनाचा केव्हाही उद्रेक होऊ शकणार असल्याने सावध राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. खासकरून बीड, नांदेड आणि लातूरबाबत त्यांनी अधिक चिंता व्यक्त केली आहे. केंद्रेकरांनी मराठवाड्यातील पोलीस, जिल्हाधिकारी आणि पालिका आयुक्तांना अलर्ट राहा, कोरोना रोखण्यासाठी कामाला लागा, असे आदेशच दिलेत.

ऑडिओ क्लिपमध्ये केंद्रेकर म्हणतात, सर्व मंगल कार्यालयांवर रेड करा, त्यांना नोटीस द्या आणि फाईन लावायला सुरुवात करा. जर तिथे बिना मास्कचे आणि अलाऊड संख्येपेक्षा जास्त लोकं असतील तर त्यांच्यावर कारवाई करा. पहिली नोटीस गेली पाहिजे. फाईन लावला पाहिजे आणि पोलीस केस दाखल करू म्हणून त्या नोटीसमध्ये उल्लेख केला पाहिजे. सेकंड टाईमला मंगल कार्यालय पुन्हा हाऊसफुल सापडले तर गुन्हा दाखल करा आणि हे मंगल कार्यालय सील करा’, असा आदेशच केंद्रेकर यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे.

‘लक्षात ठेवा पुन्हा सेकंड व्हेव फार मोठ्या प्रमाणावर येण्याची शक्यता आहे. भारतात अनेक ठिकाणी 200, 400, 500 च्या प्रमाणात रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे कृपा करून निष्काळजीपणा करू नका. आणि त्याच त्या सूचना ज्या मागच्या वर्षी दिल्या टेस्टिंग करा, तपासणी करा, आरटीपीसीआर जास्त करा, हे बोलायला लावू नका’, अशी तंबीही त्यांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!