नवी दिल्ली- कोरोना रुग्णांवर रेमडेसिवीर इंजेक्शन काहीही सकारात्मक परिणाम करत असल्याचे कोणतेही पुरावे नाहीत. त्यामुळे प्लाझ्मा थेरपीबरोबरच आता सर्वात जास्त मागणी होत असलेलं रेमडेसिवीर इंजेक्शनही कोरोना उपचाराच्या यादीतून वगळण्याची शक्यता आहे. दिल्लीतील सर गंगा राम रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. डी.एस. राणा यांनी याविषयीचे संकेत दिले आहेत.
डॉ. राणा म्हणाले की, ‘प्लाझ्मा थेरपीमध्ये कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांच्या शरीरातील अँटीबॉडीज आपण कोरोनाबाधित रुग्णाला देतो. जेणेकरून अँटीबॉडीज व्हायरसला नष्ट करतील. कोरोनाबाधित झाल्यानंतर शरीरात अँटीबॉडीज तयार होतात. पण प्लाझ्मा दान केल्यानंतरही रुग्णांमध्ये कोणतीही सुधारणा होत नाही, असे दिसून आले आहे. गेल्या वर्षभरापासून आम्ही हे त आहोत. तसेच प्लाझ्मा सहजरित्या उपलब्ध देखील होत नाही आहे. मात्र पुराव्याच्या आधारे प्लाझ्मा थेरेपी कोरोना उपचार पद्धतीतून वगळण्यात आली आहे.’
Remdesivir may be dropped soon as there is no proof of its effectiveness in treating COVID-19 patients: Dr Rana
Read @ANI Story | https://t.co/mMdykiDwz5 pic.twitter.com/0DtHtc8WXe
— ANI Digital (@ani_digital) May 18, 2021
डॉ. राणा म्हणाले की, ‘कोरोना उपचारामध्ये वापरल्या जाणाऱ्या इतर औषधांबाबत बोलायचे झाल्यास, रेमडेसिवीरचा रुग्णांवर योग्य परिणाम होत असल्याचे कोणतेही पुरावे नाही आहेत. रेमडेसिवीरचा कोरोना रुग्णावर कोणत्याही प्रकारचा परिणाम होत नाही. त्यामुळे प्लाझ्मा थेरेपी नुसार रेमडेसिवीर कोरोना उपचारपद्धतीतून वगळायला हवे. तसेच रेमडेसिवीर लवकरच कोरोनाबाधितांच्या उपचारातून वगळण्याची शक्यता आहे.’
दरम्यान, सद्यस्थितीत कोरोनाबाधित रुग्णांसाठी केवळ तीनच औषधे महत्त्वाची व प्रभावशाली बनून काम करत आहेत. कोरोना महामारीवरील उपायांसाठी सातत्याने नवनवीन माहिती गोळा करण्याचा प्रयत्न वैद्यकीय यंत्रणा करत आहे. आम्ही सर्वचजण यावर बारकाईने लक्ष ठेऊन आहोत, असेही राणा यांनी म्हटलंय.
महत्वाच्या बातम्या
- १९ मे रोजी प्रदर्शित होणार ‘फॅमिली मॅन २’चा ट्रेलर; अॅमेझॉन प्राईम व्हिडीओची घोषणा
- दिलासादायक : करोना विषाणू 99.99 टक्के नष्ट करणारी थेरेपी विकसीत करण्यात वैज्ञानिकांना आले यश
- ‘कोरोनाचा हाहाकार ; केंद्र व राज्य सरकारवर मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल करू नये?’
- ‘आघाडी सरकारकडून मराठा समाजाची फसवणूक; आरक्षणासाठी फेरविचार याचिकेला दिरंगाई का?’
- कोरोना हरतोच पण जिद्द हवी : शंभरी पार केलेल्या आजी-आजोबांनी कोरोनाला केलं चीतपट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

