Share

‘अन्नदात्याला चिरडणाऱ्या ‘या’ व्यक्तीला अद्यापही अटक का नाही?’

Published On: 

🕒 1 min read

लखनऊ : उत्तर प्रदेशामधील लखीमपूर खीरी येथे रविवारी शेतकऱ्यांसह ९ जणांना चिरडल्यानंतर देशभरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालून चिरडण्यात आले. त्यानंतर आता काँग्रेस, आम आदमी पक्ष, समाजवादी पक्षासह सर्वांनी आक्रमक प्रतिक्रिया नोंदवली आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्राने हा पराक्रम केला असल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे. त्यानंतर आता काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी यांनी या घटनेचा व्हिडीओ शेअर करत ट्विट केले आहे.

प्रियांका यांनी आपल्या ट्विट मध्ये व्हिडीओ शेअर करत त्यावर कॅप्शन दिले आहे की,’पंतप्रधान नरेंद्र मोदीजी तुमच्या सरकारने मला कोणत्याही आदेशाशिवाय आणि एफआयआरशिवाय गेल्या २८ तासांपासून कोठडीत ठेवले आहे’असे त्या म्हणाल्या. तसेच अन्नदात्याला चिरडणाऱ्या ‘या’ व्यक्तीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. का?’ असा सवालही त्यांनी केला आहे.

दरम्यान, घडलेल्या घटनेसंदर्भात माहिती मिळताच प्रियांका गांधी यांनी लखीमपूर खीरीला जाण्याचा प्रयत्न केला. परंतु, उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना रोखले. रविवारी रात्री प्रियांका आणि यूपी पोलिसांमध्ये चांगलाच वाद झालेला बघायला मिळाला. त्यावेळी प्रियकांनी यूपी पोलिसांना थेट आव्हान देत, अंगाला हात तर लावून दाखवा, कायदा आम्हालाही कळतो म्हणत, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले. रात्री उशीरा प्रियंका गांधी यांनी घटनास्थळी पोहचण्याचा प्रयत्न करत केला,परंतु यूपी पोलिसांनी त्यांना सीतापूरच्या हरगावमधून ताब्यात घेतले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!