🕒 1 min read
मुंबई: लखीमपूरमध्ये झालेल्या दुर्घटनेनंतर शेतकऱ्यांना भेटायला निघालेल्या काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी यांना तेथील प्रदेश पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.यावेळी पोलिसांशी त्यांची झटापटही झाली. त्यांना हरगाव पोलीस स्टेशन परिसरातून ताब्यात घेतले आहे. गेल्या ३० तासांपासून प्रियांका गांधींना बंदिस्त ठेवले आहे.
त्यात प्रियंका गांधी यांचा एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. त्यांना सीतापूर येथील गेस्ट हाऊसमध्ये ठेवण्यात आलं आहे. या दरम्यान, त्यांनी स्वतः हातात झाडू घेत खोलीची साफसफाई केली आहे. त्यांचा हा व्हिडिओ 5 सेकंदाचा आहे. आता यावरूनच भाजप नेते निलेश राणे यांनी प्रियांका गांधींवर निशाना साधत टोला लगावला आहे.
ही नौटंकी असली तरी मोदीजींनी यांना कुठून कुठपर्यंत आणले. कितीही नौटंकी केली तरी ह्या देशातला मतदार हुशार आहे, त्यांना त्यांचं बंर वाईट कळतं. https://t.co/o3iXyQGG1j
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) October 4, 2021
तुमची कितीही नौटंकी असली तरी मोदीजींनी यांना कुठून कुठपर्यंत आणले. हे अगोदर पाहावे. कितीही नौटंकी केली तरी ह्या देशातला मतदार हुशार आहे, त्यांना त्यांचं बंर वाईट कळतं. असे खोचक ट्वीट निलेश राणे यांनी केले आहे. दरम्यान लवकरच उत्तर प्रदेशच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे प्रियांका गांधींचा हा पब्लीसिटीसाठी केलेली नौटंकी असल्याचेही भाजपने म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
- उत्तर प्रदेशमध्ये आंदोलनाला हिंसक वळण; जिप्सी जाळली, अखिलेश पोलिसांच्या ताब्यात
- घरी जा, गुगलवर ‘टरबूज ऑफ महाराष्ट्र’ सर्च करा; खडसेंनी कार्यकर्त्यांना सांगितले काम
- ‘शेतकऱ्यांना काठीचीच भाषा कळते, लाठ्या-काठ्या उचला, अन् जशास तसे उत्तर द्या’
- ‘शेतकऱ्यांना चिरडणं ही भाजपची ‘पॉलिसी’ आहे का?, त्यांना असं चिरडणं म्हणजे ब्रिटीशी वागणूक’
- तेही म्हणत असतील कारखान्याला माझे नाव देऊन वाट लावली- अजित पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
