मुंबई: उत्तर प्रदेशातल्या लखीमपूर खिरी येथील घटना त्यात पीडित कुटुंबाच्या भेटीसाठी निघालेल्या प्रियांका गांधींना उत्तर प्रदेश सरकार आणि पोलिसांनी अटक केली. त्यांना स्थानबद्ध केलं. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा देशासाठी फार मोठा त्याग आहे. प्रियांका त्यांची नात आहे. त्यांनी पीडितांची भेट घेणं गुन्हा आहे का? असा संतप्त सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
देशासाठी ज्या कुटुंबाचा मोठा त्याग, प्रियांका त्या कुटुंबातून, त्यांचा गुन्हा काय? प्रियांका गांधींशी पोलिसांचं वागणं अत्यंत असभ्य होतं. पोलिसांनी कशा पद्धतीने कारवाई केली हे सर्वांनी पाहिलं. त्यांचा गुन्हा काय होता ती त्यांना ताब्यात घेतलं गेलं? असे सवाल संजय राऊत यांनी केले आहेत.
तर उत्तर प्रदेशमध्ये राम मंदिराचं निर्माण सुरु आहे. पण खरंच तिथे राम राज्य आहे का, कारण ज्या पद्धतीने शेतकरी आंदोलकांना चिरडण्यात आलं, ते पाहून कुणाच्याही अंगाचा थरकाप उडेल. अशी संतप्त प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे. त्यांनी सामना अग्रलेखातूनही योगी सरकारवर टीका केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- उत्तर प्रदेशमध्ये आंदोलनाला हिंसक वळण; जिप्सी जाळली, अखिलेश पोलिसांच्या ताब्यात
- घरी जा, गुगलवर ‘टरबूज ऑफ महाराष्ट्र’ सर्च करा; खडसेंनी कार्यकर्त्यांना सांगितले काम
- ‘शेतकऱ्यांना काठीचीच भाषा कळते, लाठ्या-काठ्या उचला, अन् जशास तसे उत्तर द्या’
- ‘शेतकऱ्यांना चिरडणं ही भाजपची ‘पॉलिसी’ आहे का?, त्यांना असं चिरडणं म्हणजे ब्रिटीशी वागणूक’
- तेही म्हणत असतील कारखान्याला माझे नाव देऊन वाट लावली- अजित पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

