🕒 1 min read
लातूर : जिल्ह्यात सर्वाधिक कोरोना रुग्णांचे ऑक्सिजन, व्हेंटिलेटर अभावी मृत्यू झाले आहेत. त्यामुळेच हेच का ते कोरोना परिस्थितीवर आपण मिळवलेले यश? असा संतप्त सवाल आमदार संभाजी पाटील निलंगेकरांनी उपस्थित केलाय. कोराना परिस्थिती हाताळण्यात लातूर जिल्हा प्रशासन कमी पडले असल्याचा आरोपही त्यांनी केला. प्रशासन मांडत असलेल्या भूमीकेशी आपण सहमत नसल्याचे स्पष्ट करत त्यांनी यंत्रणेच्या कामावर नाराजी व्यक्त केली.
या संदर्भात संभाजी पाटील निलंगेकर यांनी म्हटले की, ‘लातूर जिल्ह्यात सर्वाधिक कोरोना रुग्णांचे ऑक्सिजन, व्हेंटिलेटर अभावी मृत्यू झाले आहेत. त्यामुळेच हेच का ते कोरोना परिस्थितीवर आपण मिळवलेले यश? मृत्यूदराची खोटी आकडेवारी, मृतांच्या नातेवाईकांसाठी कोणतीही आर्थिक तरतूद नाही, रुग्णालयात बेड उपलब्ध नाहीत आणि या परिस्थितीत आपण स्वतःची पाठ कशी थोपटून घेऊ शकता? लातूर जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्याबाबत झालेला ढिसाळपणा राज्य सरकारने मान्य करावा.’
लातूर जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या सध्या कमी असली तरी, तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. त्यामुळे आगामी काळात उपाय योजनेसंदर्भात आढावा बैठकीत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. कोरोना काळात मृत्यू झालेल्या मृतांच्या नातेवाईकांना तत्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी देखील त्यांनी केली.
महत्त्वाच्या बातम्या
- पवारांनी फक्त पुतण्या, मुलगी, नातू यांनाच मोठं केलंय; गोपीचंद पडळकर यांची टीका
- ‘जिम-मॉल सुरु झाले, सिनेमांना इतर पर्याय मिळाले…मात्र नाट्यभूमीचं काय ?’
- कोविड प्रतिबंधाकरीता नागरिकांनीही प्रयत्न करावेत – आदित्य ठाकरे
- ‘एक गोष्ट लाख सत्य, अमेरिकेने पूर्ण जगाशी गद्दारी केली अन्…’; जितेंद्र आव्हाड संतापले
- पवारांनी फक्त पुतण्या, मुलगी, नातू यांनाच मोठं केलंय; गोपीचंद पडळकर यांची टीका


