कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी आज कोल्हापुरात मूक आंदोलन पार पडले. राज्यभरातील मराठा समन्वयक आंदोलनात सहभागी झाले होते. याशिवाय वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरही आंदोलनाला हजर होते. तसंच कोल्हापुरातील आमदार, खासदारांनीही मूक मोर्चाला उपस्थिती लावली आहे. आंदोलनस्थळी लोकप्रतिनिधींनी मराठा आरक्षणांच्या बाबतीत आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी शिवसेनेचे खासदार धैर्शील माने हे देखील उपस्थित होते. त्यांनी देखील आरक्षणप्रश्नी आपली भूमिका स्पष्ट केली.
महाराष्ट्राला दिशा देण्यासाठी कोल्हापूरने एक पाऊल पुढे घेतलं. सर्व प्रतिनिधींना एकत्र केलं. संभाजीराजेंनी सर्वांना हाक दिली, प्रकाशजी आंबेडकर सुद्धा कोल्हापूमध्ये आले, हे पाऊल निश्चित पणे यशस्वी होतील. संभाजीराजे आणि प्रकाश आंबेडकरांनी रणशिंग फुंकलं आहे. हे नक्कीच यशस्वी होईल. असे खासदार धैर्शील माने यांनी आंदोलस्थळी बोलताना म्हंटले आहे.
आरक्षण कोणामुळे थांबलं, आरक्षणाला कोणीच विरोध करत नसताना हा पेच सुटत का नाही हा समाजाला प्रश्न. महाराष्ट्रातील सर्व 48 खासदारांनी आणि सर्व आमदारांनी एकत्र यावं आणि केंद्राला विशेष अधिवेशन घेण्यासाठी भाग पाडावं. मराठा आरक्षणासाठी मी लोकसभेत आवाज उठवेन, पंतप्रधान, राष्ट्रपतींनाही भेटेन, असं देखील शिवसेना खासदार धैर्यशील माने म्हणाले.
न्यायालयीन लढाईत बाजू व्यवस्थित मांडण्यासाठी समिती गठीत झाली आहे. महाराष्ट्राने नवीन मागास आयोगही नेमला. हा राज्याचा की केंद्राचा हा प्रश्न समाजाला आहे. एका बाजूला जनरेटा तयार होतोय, दुसऱ्या बाजूला 48 खासदारांनी अधिवेशनाची मागणी करावी, लोकसभेच आधिवेशन मराठा समाजासाठी झालं पाहिजे, राजेंनी संयमाने भूमिका घेतली आहे. असंही धैर्यशील माने म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘ठाकरे सरकारचा निर्णय दारू विक्रेत्यांसाठी’, चंद्रपूर दारूबंदी उठवण्याचा ५०० गावांकडून निषेध
- राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त विनापरवानगी सत्कार सोहळा, मनसे पदाधिकाऱ्यांवर गुन्हा
- ‘रावसाहेब दानवे हे आमचे चांगले मित्र, त्यांच्या विनोदी शैलीचे कौतुकच’, राऊतांची प्रतिक्रिया
- बाजारभावापेक्षा कमी किमतीतच जमीन खरेदी, राममंदिर ट्रस्टचा खुलासा
- अजित पवारांच्या आवाहनावर संभाजीराजेंची प्रतिक्रिया, म्हणाले..


