Share

… म्हणून गज्या मारणेने अटकेनंतर चक्क मेढा पोलिसांना ठोकला सलाम

Published On: 

पुणे- मागील काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यात काही गँगस्टरने डोके वर काढण्यास सुरुवात केली होती. नुकतीच कारागृहातून बाहेर येताच मारणे टोळीचा म्होरक्या कुख्यात गुंड गज्या मारणे याने रॅली काढून दहशत माजवली होती. पुणे पोलिसांवर यानंतर चौफेर टीका झाली होती. आता पोलिसानी धडक कारवाईला सुरुवात केली आहे.

गजा मारणे यानेमुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरून ही शेकडो चारचाकी गाड्या घेऊन ही मिरवणूक काढण्यात आली होती.या घटनेचे व्हिडीओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झाले होते. यानंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांसह पुणे पोलिसांनी देखील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गजा मारणेवर गंभीर गुन्हे दाखल केले होते.यानंतर अटकेच्या भीतीने गजा मारणे पुणे पोलिसांच्या फरार झाला होता.

दरम्यान,यानंतर परवा सातारा पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.मेढा पोलिसांनी पाठलाग करुन गजा मारणेला जेरबंद केलं. जावळी-महाबळेश्वर भागात गजा मारणे असल्याचा सुगावा लागताच मेढा पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली.गजा मारणे याला शनिवारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माने यांनी अगदी फिल्मी स्टाईलने पकडलं.

दरम्यान,अटक झाल्यानंतर गज्या मारणे याने चक्क पोलिसांना सलाम ठोकला. इतक्या अंधारात गाडी पण ओळखली आणि मलाही ओळखलं असं म्हणत त्याने मेढा पोलीस ग्रेट आणि माने साहेबपण ग्रेट’ अशी प्रतिक्रिया दिली.यावेळी त्यांच्यासोबत वाहन चालक जितेंद्र कांबळे होते.

गज्या म्हणाला, गेला महिनाभर मी तीन कमिशनर आणि दोन एसपींना गुंगारा देत होतो. मात्र फक्त दोन दिवसासाठी घात झाला. एवढ्या अंधारात गाडीपण ओळखली आणि मला पण ओळखलं तुमच्या माने साहेबांनी. मेढा पोलिस ग्रेट आणि माने साहेबपण ग्रेट…

गज्या म्हणाला, दोन जामीन झाले. आणि एक जामीन नऊ तारखेला होणार होता. तोपर्यंत वकिलांनी पोलिसांपासून लपून रहायला सांगितले होते. फक्त दोनच दिवस राहिले होते. मात्र एवढ्या आडबाजूला येऊन पण पोलिसांना सापडलोच. ग्रेट मेढा पोलिस आणि ग्रेट तुमचा माने सायेब.दरम्यान,गजा मारणेला पकडल्यानंतर सातारा पोलिसांचे कौतुक होत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!