Share

दीपालीच्या चव्हाण प्रकरणात एमएस रेड्डी यांना सहआरोपी करण्याची मागणी का होतेय ?

Published On: 

🕒 1 min read

मुंबई – काही दिवसांपूर्वी मेळघाटच्या हरिसाल येथील वनक्षेत्राच्या वनाधिकारी दीपाली चव्हाण यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. त्यांचे वरिष्ठ विनोद शिवकुमार यांच्या त्रासाला कंटाळून त्यांनी आपले जीवन संपविले होते. यापार्श्वभुमीवर मेळघाट वनक्षेत्राचे माजी प्रादेशिक संचालक एमएस रेड्डी यांना शासनाने निलंबित केले असल्याची माहिती समोर आली आहे.

दीपाली चव्हाण यांनी मृत्यूआधी एक पत्र लिहिले होते. त्यामध्ये त्यांनी विनोद शिवकुमार याच्या काळ्या कारवायांबाबत लिहून ठेवले आहे. त्यांनी अनेकदा मेळघाट वनक्षेत्राचे प्रादेशिक संचालक एमएस रेड्डी यांच्याकडे तक्रार करूनही त्यांनी कारवाई केली नाही असेही या पत्रात लिहिले होते. यानंतर आता रेड्डी यांच्यावर राज्य सरकारने कारवाई केली आहे.

दरम्यान,वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणी अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांच्यावरील निलंबन कारवाई पुरेशी नसून त्यांना या प्रकरणात सहआरोपी करावे व त्यांची विभागीय चौकशी करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश महिला मोर्चाने केली आहे.

या संदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष उमा खापरे यांनी म्हटले आहे की, दीपालीच्या मारेकऱ्यांना तातडीने पकडले जावे व त्यांना कठोर शिक्षा व्हावी यासाठी अमरावती जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी, माजी आमदार डॉ. सुनील देशमुख, प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी, शहराध्यक्ष किरण पातुरकर, महिला मोर्चा प्रदेश सरचिटणीस अश्विनी जिचकार, सौ. सुरेखा लुंगारे, सौ. शिल्पा पाचघरे, मीना पाठक, रश्मी नावंदर, लता देशमुख, अर्चना पखान यांनी जिल्हा प्रशासनाकडे व पोलिसांकडे आग्रही भूमिका घेतली.

शिवकुमार व रेड्डी या दोघांनाही निलंबित करावे या मागणीसाठी आंदोलनही केले होते. महिला मोर्चाच्या दबावामुळे रेड्डी यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली आहे. मात्र ही कारवाई पुरेशी नसून त्यांना दीपालीच्या आत्महत्या प्रकरणात सहआरोपी केले जाणे आवश्यक आहे. तसेच त्यांची शासनाकडून विभागीय चौकशी करणे गरजेचे आहे. या मागण्या मान्य न केल्यास महिला मोर्चा राज्यभर आंदोलन करेल, असा इशाराही उमा खापरे यांनी दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!