Share

कृषी कायदा : ‘विरोधक अफवा, गैरसमज पसरवण्याचे काम करत आहेत त्यांचा अभ्यास शून्य आहे’

Published On: 

🕒 1 min read

कुडाळ : केंद्राच्या नव्या कृषी कायद्यांच्या समर्थनासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं कालपासून विशेष मोहीम सुरू करण्यात आली. या मोहिमेद्वारे नव्या कृषी कायद्यांसंदर्भातील गैरसमजुती दूर करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. राज्यातही काल या अनुषंगानं भाजपाच्या विविध नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन कृषी कायदे शेतकरी हिताचेच असल्याचं सांगितलं.

शेतकरी समृद्ध व्हावा यासाठीच केंद्र सरकारनं कृषी कायदे आणले पण कृषी कायद्याबाबत विरोधकांकडून गैरसमज पसरवले जात आहेत, असा आरोप भाजपा नेते नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ इथं वार्ताहर परिषदेत बोलताना काल केला.

राणे म्हणाले, विरोधक हे विधेयक समजून न घेता आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांच्या भावना भडकविण्याचे काम करत आहेत. त्यांच्या या आंदोलनाला शेतकऱ्यांनी बळी पडू नये. विधेयकाचा हेतू या देशातील शेतकरी समृद्ध व्हावा, शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट व्हावे, हा आहे. शेतकरी आपला माल कुठेही मुक्तपणे विकतील, बाजार भाव ठरवतील, अधिक आर्थिक फायदा होईल, दलाल, गुंड पध्दत रद्ध होईल, अर्थव्यवस्या बळकट होईल.

गाव ते परदेशात कुठेही आपला माल विकण्याचे स्वतंत्र या विधेयकामुळे मिळाले आहे. एक देश एक बाजार हा मंत्र घेऊन मोदींनी योजना सुरू केली. विरोधक अफवा, गैरसमज पसरवण्याचे काम करत आहेत. त्यांचा अभ्यास शून्य आहे असं राणे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!