मुंबई : कोरोना काळात आरोग्य यंत्रणेची कमतरता असल्याने अनेक रुग्णांना जीव गमवावा लागला. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यातही कोरोना रुग्णांना याचा त्रास झाला. यावरुन माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते नारायण राणे यांनी शिवसेनेवर टीका केलीय. कोरोना काळात शिवसेनेने या दोन्ही जिल्ह्याला मृत्यू दिले असल्याचा गंभीर आरोप राणे यांनी केला आहे.
या संदर्भात राणे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केलीय. राणे यांनी म्हटले की, ‘सिंधुदुर्ग-रत्नागिरीने शिवसेनेला स्थापनेपासून साथ केली, त्याबदल्यात शिवसेनेने कोरोना काळात सिंधुदुर्गात ९०१ तर रत्नागिरीमध्ये १५६१ मृत्यु दिले. याला संपूर्ण जबाबदार उद्धव ठाकरे आहेत. दोन्ही जिल्ह्यात डॉक्टर नाही, नर्स, वार्डबॉय, औषध पुरवठा व ऑक्सिजन नाही. एवढ्या वर्षाच्या निष्ठेनंतर सिंधुदुर्ग व रत्नागिरीच्या पदरी मृत्यू. मा. मुख्यमंत्री हीच का उपकाराची परतफेड?’
कोरोना काळात आरोग्य यंत्रणा आणि सरकारी नियोजनावर भाजपच्या वतीने वारंवार टीका करण्यात आली. राज्यातील मृत्यूदरही इतर राज्यांच्या तुलनेत जास्त आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारवर विरोधकांनी टीका केली. त्यात आता दुसऱ्या लाटेनंतर मृत्यूदराचे आकडे चिंताजनक आहे. तिसरी लाट येण्याआधी त्यावरील उपाय-योजना करणे अत्याश्यक आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- पुण्यात आज कोरोना मृत्यूंमध्ये घट; तर ‘इतक्या’ रुग्णांची भर !
- शिर्डीचे साईमंदिर कधी उघडणार? खा.सुजय विखे म्हणाले..
- गोव्यातील लॉकडाऊन कधी उठणार? जाणून घ्या मुख्यमंत्री सावंत काय म्हणाले..
- ‘…हा योगायोग नाही ! अटक होणारे शिवसेनेशी संबंधित कसे ?’; नितेश राणेंचा नेमका इशारा काय ?
- ‘महाराष्ट्रातील जनतेचीही तशीच इच्छा’, जयंत पाटलांनी मिसळला राऊतांच्या सुरात सूर

