पुणे : कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत अधिक रुग्ण नोंदवले जात आहेत. दरम्यान, पुणे शहरात एप्रिल महिन्यात दररोज पाच ते सात हजार रुग्णांची वाढ होत होती. यामुळे पुणे शहरासह जिल्ह्यासाठी देखील ही बाब गंभीर होती. यानंतर कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने घसरल्यामुळे काहीसा दिलासा मिळाला.
१४ जूनपासून शहरात निर्बंध अधिक शिथिल झाले असून पुणे आता पूर्वपदावर येत आहे. अशातच कोरोनाचा धोका हा पूर्णपणे टळला नसून योग्य खबरदारी घेणं आवश्यक आहे. १४ जून रोजी १८८ रुग्णांची नोंद करण्यात आली होती. यानंतर या आकड्यात काल वाढ झाली. १६ जून रोजी २९५ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद केली गेली. दरम्यान, आज कोरोना मृत्यूंच्या आकड्यात पुन्हा घट झाली असून नव्या कोरोना बाधितांचा आकडा देखील काल पेक्षा कमी आहे.
आज (दि. १७ जून) २५७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, शहरातील २८४ कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या ४ लाख ६३ हजार ८८५ झाली आहे. दरम्यान, पुणे शहरात उपचार घेणाऱ्या(ऍक्टिव्ह रुग्ण) २ हजार ७०३ रुग्णांपैकी ४३७ रुग्ण गंभीर तर ६६९ रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. नव्याने ८ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
महत्वाच्या बातम्या
- संभाजीराजे सत्तेत आल्याशिवाय आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही – प्रकाश आंबेडकर
- शिर्डीचे साईमंदिर कधी उघडणार? खा.सुजय विखे म्हणाले..
- गोव्यातील लॉकडाऊन कधी उठणार? जाणून घ्या मुख्यमंत्री सावंत काय म्हणाले..
- ‘…हा योगायोग नाही ! अटक होणारे शिवसेनेशी संबंधित कसे ?’; नितेश राणेंचा नेमका इशारा काय ?
- ‘महाराष्ट्रातील जनतेचीही तशीच इच्छा’, जयंत पाटलांनी मिसळला राऊतांच्या सुरात सूर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

