मुंबई : एन्काउंटर स्पेशलिस्ट असलेले मुंबई पोलिस दलातील माजी अधिकारी प्रदीप शर्मा यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने अटक केली आहे. प्रदीप शर्मा यांच्या मुंबईतील अंधेरी परिसरातील घरावर राष्ट्रीय तपास यंत्रणेने छापे टाकले. सकाळी सहा वाजल्यापासून कारवाईला सुरुवात झाली होती. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवास्थानाबाहेरील स्फोटकं आणि मनसुख हिरेन प्रकरणात प्रदीप शर्मा एनआयएच्या रडारवर होते.
प्रदीप शर्मा यांना लोणावळ्यातील रिसॉर्टमधून त्यांना ताब्यात घेण्यात आलं होतं. सहा तासांच्या चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली. प्रदीप शर्मा यांना शिवसेना नेता म्हणून ओळखलं जातं. २०१९ मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. शिवसेनेनं त्यांना नालासोपारा मतदारसंघातून विधानसभेचं तिकीट दिलं होतं. मात्र, यात त्यांना प्रभाव स्वीकारावा लागला होता. आता शिवसेनेशी पूर्वसंबंध असलेल्या वाझेनंतर शर्मा यांना देखील अटक झाल्याने भाजप नेत्यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे.
How come every one who r either gettin arrested or investigated in the Antilia n Hiren murder case are directly or indirectly related to shiv Sena?
Can’t be a coincidence!!
And we still wondering who their godfather is??!!
It’s Uddhav Thackeray.— Nitesh Rane (@NiteshNRane) June 17, 2021
भाजप आमदार नितेश राणे यांनी या सर्व प्रकरणामागे शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा हात असल्याचा आरोप केला आहे. ‘अँटिलिया आणि हिरेन यांच्या हत्येप्रकरणात ज्यांना अटक करण्यात आली आहे किंवा तपास केला गेला आहे अशा प्रत्येक व्यक्तीचा थेट किंवा अप्रत्यक्षपणे शिवसेनेशी संबंध कसा? हा योगायोग असू शकत नाही.आणि आम्ही अजूनही आश्चर्य करतो की त्यांचे गॉडफादर(सूत्रधार) कोण आहे ? ते उद्धव ठाकरे आहेत.’ असा खळबळजनक आरोप नितेश राणे यांनी ट्विटद्वारे केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- राकेश टिकैत यांचा एल्गार, शेतकरी देशातील सर्व राजभवनांना घेराव घालणार
- शिर्डीचे साईमंदिर कधी उघडणार? खा.सुजय विखे म्हणाले..
- गोव्यातील लॉकडाऊन कधी उठणार? जाणून घ्या मुख्यमंत्री सावंत काय म्हणाले..
- ‘आगामी निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार’, चंद्रकांत खैरेंची माहिती
- ‘महाराष्ट्रातील जनतेचीही तशीच इच्छा’, जयंत पाटलांनी मिसळला राऊतांच्या सुरात सूर


