नवी दिल्ली : उत्तराखंडचे नवेनिर्वाचीत मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी महिलांबाबत केलेल्या वक्त्याव्यामुळे त्यांच्यावर देशभरातून संताप व्यक्त केला जाता आहे. महिला नेत्यांनी देखील यावरून निशाणा साधत टीका केली होती. मात्र टीका झाल्यानंतरही रावत यांनी आपली भूमिका कायम ठेवली आहे. याचदरम्यान आता पुन्हा एकदा तीरथ सिंह रावत यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. रावत यांनी “कोरोना काळात जास्त धान्य मिळवण्यासाठी तुम्ही जास्त मुलं जन्माला का घालत नाही?” असा थेट प्रश्न उपस्थितांना केला आहे.
“कोरोना काळात प्रभावित झालेल्या प्रत्येक कुटुंबाला प्रती सदस्य ५ किलो धान्य मिळाले आहे. ज्यांच्या घरात १० सदस्य आहेत त्यांना ५० किलो धान्य मिळालं. तसेच ज्यांच्या घरात २० सदस्य आहेत त्यांना एक क्विंटल धान्य मिळालं. ज्या घरात २ सदस्य आहेत त्यांना केवळ १० किलो धान्य मिळाले. अनेक लोकांनी हे धान्य साठवलं आणि ते विकलं” असं रावत यांनी म्हटलं आहे.
#WATCH हर घर में पर यूनिट 5 किलो राशन दिया गया।10 थे तो 50 किलो, 20 थे तो क्विंटल राशन दिया। फिर भी जलन होने लगी कि 2 वालों को 10 किलो और 20 वालों को क्विंटल मिला। इसमें जलन कैसी? जब समय था तो आपने 2 ही पैदा किए 20 क्यों नहीं पैदा किए: उत्तराखंड CM मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत pic.twitter.com/cjh2hH5VKh
— ANI_HindiNews (@AHindinews) March 21, 2021
नैनीताल जिल्ह्यातील रामनगरमध्ये एका कार्यक्रमादरम्यान धान्यवाटपाविषयी बोलताना त्यांनी हे वादग्रस्त विधान केलं आहे. “मी असा चांगला तांदुळ कधीही खालेला नाही. आता याचा दोष कुणाला द्यायचा? आपल्याकडे वेळ असताना आपण दोनच मुलांना जन्म दिल्याबद्दल आता तुम्हाला वाईट वाटेल. आपण २० मुलांना जन्म का दिला नाही असंही तुम्हाला वाटत असेल” असंही तीरथ सिंह रावत यांनी म्हटलं आहे. तीरथ सिंह रावत यांनी पुन्हा एकदा केलेल्या या वादग्रस्त वक्त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मात्र, या सगळ्याचा त्यांच्यावर कोणताही परिणाम होत नसल्याचे दिसून येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोना लस न घेताच मिळालं लस घेतल्याचं प्रमाणपत्र; प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा उघड
- ‘आता देशमुखांनी परमबीर सिंह यांच्या काळ्या कारनाम्याची माहिती देणारे १६ पानी पत्र प्रसिद्ध करावे’
- ‘दिल्लीतील बैठका म्हणजे १०० कोटीच्या हिस्सेदारांची चाललेली धावपळ’
- महाराष्ट्रातील राजकीय भूकंपाचे केंद्र ‘दिल्ली’, दिल्लीत राष्ट्रवादीची बैठक सुरु
- मोठी बातमी : अनिल देशमुख यांच्याविरोधात तक्रार दाखल


