ऑस्ट्रेलिया : सात जानेवारीपासून तिसरा कसोटी सामना होणार आहे. त्यानंतर अखेरचा व चौथा कसोटी सामना हा ब्रिस्बेन येथे १५ जानेवारीपासून खेळवण्यात येणार आहे. पण भारतीय टीमला चौथ्या टेस्टसाठी ब्रिस्बेनला जायचं नाही, अशी बातमी समोर येत आहे. यामागचं प्रमुख कारण टीमला पुन्हा क्वारंटाईन व्हायचं नाही, कारण सिडनीमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे.
ऑस्ट्रेलियाला पोहोचल्यावर 14 दिवसांचा क्वारंटाईन कालावधी घालवल्यानंतर खेळाडूंना इतर लोकांप्रमाणेच स्वातंत्र्य मिळेल, असं भारतीय टीमला वाटत होतं. पण ब्रिस्बेनमध्ये पोहोचल्यानंतर टीमला पुन्हा एकदा बायो बबलमध्ये जावं लागू शकतं. त्यामुळे टीम इंडियाला सिडनीमध्येच राहण्याची ईच्च आहे.
क्रिकबझशी बोलताना भारतीय टीमच्या सूत्राने सांगितलं, ‘ऑस्ट्रेलिया पोहोचण्याच्या आधी आम्ही 14 दिवस दुबईमध्ये क्वारंटाईन होतो. त्यानंतर ऑस्ट्रेलियात आल्यानंतर पुन्हा 14 दिवस क्वारंटाईन झालो. याचा अर्थ आम्ही महिनाभर कठीण बबलमध्ये होतो. दौरा संपताना आम्हाला पुन्हा क्वारंटाईन व्हायचं नाही. आम्हाला ब्रिस्बेनला जायची इच्छा नाही.’
महत्वाच्या बातम्या
- तैमुरच्या मित्राला शुभेच्या देत करीनाने शेअर केला गोंडस फोटो
- उदयनराजेंचा शब्द राखला ! तब्बल ‘इतक्या’ ग्रामपंचायत झाल्या बिनविरोध
- ‘त्यांचा नेम चुकला आणि बाण धनुष्यातचं घुसला…’
- अँजिओप्लास्टी नंतर सौरव गांगुलीची प्रकृती स्थिर
- सावित्रीबाई फुले मालिका टीआरपी अभावी बंद करावी लागते हे दुर्दैव कोणाचे ? : रोखठोक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
