Share

सावित्रीबाई फुले मालिका टीआरपी अभावी बंद करावी लागते हे दुर्दैव कोणाचे ? : रोखठोक

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच स्वातंत्र्यपूर्व काळात समाजातील महिलांना शिक्षणाचा मूलभूत हक्क मिळाला. त्या काळात त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला होता. प्रसंगी दगडधोंडे देखील त्यांनी सहन केले. मात्र, समाज परिवर्तनाचा ध्यास त्यांनी सोडला नाही.

त्यांच्या याच संघर्ष जीवनावर मराठी मालिका सुरु करण्यात आली होती. मात्र, प्रेक्षकांच्या अत्यल्प प्रतिसादामुळे ही मालिका बंद करावी लागत आहे. ‘सावित्रीजोती’ असं मालिकेचं नाव होतं. सोनी मराठी या वाहिनेवर ही मालिका सुरु करण्यात आली होती. टीआरपी नसल्यामुळे ही मालिका बंद करावी लागली असून निर्माते महेश टिळेकर यांनी प्रेक्षकवर्गाला जबाबदार धरलं आहे.

‘सत्यशोधक’ जोतिबा व सावित्री फुले यांच्यावरील मालिकेस प्रेक्षक नाहीत. त्यामुळे ‘सावित्रीजोती’ विझली आहे. ज्यांनी आपल्याला घडविले व उभे केले त्यांच्याविषयी समाज कृतज्ञ का नाही? पुरोगामी महाराष्ट्राचे हे अधःपतन आहे. महाराष्ट्र घडविणाऱ्या आणि समाजाला दिशा देणाऱ्या थोर पुरुषांचे नव्या पिढीस विस्मरण झाले आहे. फुले, आंबेडकर, शाहूंचा महाराष्ट्र असे आपण नेहमी म्हणतो. पण या तिन्ही पुढाऱ्यांचा वापर आता फक्त निवडणुकी पुरता होतो. तसे नसते तर महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित ‘सावित्रीजोती’ ही मालिका बंद करावी लागली नसती.

महात्मा फुले, सावित्रीबाईंचे महाराष्ट्रावर उपकार आहेत. महिला वर्गावर तर प्रचंड उपकार आहेत. पंजाबात शेतकऱयांचा आक्रोश सरकारविरुद्ध पेटला आहे. पण ब्रिटिश राजपुत्राचा श्रीमंती थाट उतरविण्यासाठी हिंदुस्थानातील शेतकऱयांची दैन्यावस्था दाखविण्यासाठी फाटक्या वस्त्रात, जोतिराव राजपुत्राच्या दरबारात पोहोचले. त्यांनी शेतकऱयांचे दुःख वेशीवर टांगले. त्या जोतिरावांच्या मालिकेस महाराष्ट्रात प्रेक्षक नाही. टीआरपी नाही म्हणून ती बंद करावी लागते. हे दुर्दैव कोणाचे? अशी खंत सामनाच्या रोखठोक मधून व्यक्त करण्यात आली आहे.

वाचा आजचा सामना रोखठोक 

‘सत्यशोधक’ जोतिबा व सावित्री फुले यांच्यावरील मालिकेस प्रेक्षक नाहीत. त्यामुळे ‘सावित्रीजोती’ विझली आहे. ज्यांनी आपल्याला घडविले व उभे केले त्यांच्याविषयी समाज कृतज्ञ का नाही? पुरोगामी महाराष्ट्राचे हे अधःपतन आहे. महाराष्ट्र घडविणाऱ्या आणि समाजाला दिशा देणाऱ्या थोर पुरुषांचे नव्या पिढीस विस्मरण झाले आहे. फुले, आंबेडकर, शाहूंचा महाराष्ट्र असे आपण नेहमी म्हणतो. पण या तिन्ही पुढाऱ्यांचा वापर आता फक्त निवडणुकी पुरता होतो. तसे नसते तर महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित ‘सावित्रीजोती’ ही मालिका बंद करावी लागली नसती.

महात्मा फुले, सावित्रीबाईंचे महाराष्ट्रावर उपकार आहेत. महिला वर्गावर तर प्रचंड उपकार आहेत. पंजाबात शेतकऱयांचा आक्रोश सरकारविरुद्ध पेटला आहे. पण ब्रिटिश राजपुत्राचा श्रीमंती थाट उतरविण्यासाठी हिंदुस्थानातील शेतकऱयांची दैन्यावस्था दाखविण्यासाठी फाटक्या वस्त्रात, जोतिराव राजपुत्राच्या दरबारात पोहोचले. त्यांनी शेतकऱयांचे दुःख वेशीवर टांगले. त्या जोतिरावांच्या मालिकेस महाराष्ट्रात प्रेक्षक नाही. टीआरपी नाही म्हणून ती बंद करावी लागते. हे दुर्दैव कोणाचे?

सत्याची मुस्कटदाबी सत्ता, श्रीमंती व अधिकार हे नेहमीच सत्याची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न करीत असतात. सत्यशोधक समाज स्थापून जनतेला सत्य सांगण्याचा प्रयत्न केल्याबद्दल जोतिराव फुले यांचाही कमी छळ झाला नाही. पण आज प्रेक्षकांचा छोटय़ा पडद्यावर सासूने सुनेचा केलेला छळ पाहण्यास जास्त कल आहे. कट, कपट, कारस्थान, स्वैराचार, घरभेदीपणा अशा गोष्टी असलेल्या मालिकांना तुफान लोकप्रियता मिळते. त्यांचे ‘टीआरपी’ वाढत जातात.

पण जोतिराव, सावित्रीबाईंना प्रेक्षक वर्ग नाही. त्यांच्या नावाने शिक्षणाच्या सवलती, आरक्षणाचे लाभ घेणाऱयांनी तरी थोडी कृतज्ञता बाळगायला हवी. जिथे देवाचे स्वरूपच माणसाने ठरविले तिथे माणसाचे स्वरूप तुम्ही कोण ठरवणार? असा परखड सवाल टाकून सत्यशोधनाचा झेंडा शिवरायांच्या भूमीत रोवणारा हा महाराष्ट्राचा महात्मा. सामाजिक क्रांतीचे अग्रदूत, नव विचारांची, नव आचारांची सुमने उधळणारे हे महात्मा फुले. ‘तू माणूस आहेस. तू ज्या जातीत जन्मलास, तिने तुझे मोल ठरत नाही,’ असे बजावणारा हा ‘माळी’ बहुजन समाजाची फुलबाग फुलवून गेला.

त्या ‘ओबीसी’नामक फुलबागेचे आज अनेक राजकीय हिस्सेदार बनले. पण महात्मा फुले यांची मालिका बंद पडू नये व त्या मालिकेतून महात्मा लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी कोणी काय केले? समुद्रात शिवाजी महाराजांचे स्मारक होत आहे. दादरच्या इंदू मिलमध्ये 14 एकरांत डॉ. आंबेडकरांचे स्मारक होणार आहे. पण महाराष्ट्राच्या सामाजिक क्रांतीचे अग्रदूत महात्मा फुले यांची मालिका बंद पडली, ही वेदनाही कुणाच्या मनात जाणवत नाही!

प्रा. नरके! प्रा. हरी नरके यांनी ‘सावित्रीजोती’ मालिकेसाठी संशोधन केले. प्रा. नरके यांनी त्यांची वेदना व्यक्त केली. ते म्हणतात, ‘सावित्रीजोती’सारखे लोक बहुजनांना आपलेसे न वाटणे हा करंटेपणा आहे. आपल्या पूर्वजांच्या त्यागाबद्दलची ही बेफिकिरी आहे. बेपर्वा वृत्ती आहे!’ मराठी सिनेमा क्षेत्रातील निर्माते व चळवळे यांनी मालिका बंद पडल्याबद्दल आवाज उठवला. पण लक्षात कोण घेतोय? नवऱयांची लफडी, सासू-सुनांचे भांडण, येता जाता एकमेकानच्या विरोधात कुरघोडी करणाऱया जावा, व्यभिचाराचे खुले उदात्तीकरण हे सर्व बटबटीत पाहण्याची सवय प्रेक्षकांना लागली आहे काय? विशेषतः महिला प्रेक्षकांना ही सवय लागली आहे काय? असा प्रश्न निर्माते महेश टिळेकरांनी विचारला आहे.

पण मुलींसाठी पहिली शाळा काढणारे, त्यासाठी आपला वाडा देणारे, दलितांसाठी आपल्या वाड्यातील विहीर खुली करणारे फुले दाम्पत्य आपल्याला प्रिय नाही! पुरोगामी महाराष्ट्राचे हे अधःपतन आहे! सत्ताधारी काय करणार? सोनी मराठी वाहिनीवर ‘सावित्रीजोती’ मालिका सुरू आहे. ती आता बंद केली जाईल. सोनी ही मोठी कंपनी आहे. एखादी मालिका तोटय़ात चालली म्हणून ते चॅनल बंद पडले नसते. पण प्रत्येकजण आपल्या वैयक्तिक फायद्या-तोटय़ाचाच हिशोब पाहतात.

जोतिबा फुले आणि सावित्रीबाईंनी व्यवहार पाहिला नाही. त्यांनी वैयक्तिक झिज सोसून काम केले नसते तर आजचा एकसंध समाज दिसला नसता. अशा ऐतिहासिक मालिकांना सरकारने अनुदान द्यावे ही मागणी केली जात आहे. स्वतः छगन भुजबळ यांनीही मागणी करावी याचे आश्चर्य वाटते. ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनीही हीच मागणी केली आहे. ही मालिका बंद पडू नये हे मान्य, पण सरकारने प्रत्येक गोष्टीत अनुदान द्यावे हे अयोग्य. समाज म्हणून आपली काही जबाबदारी आहे की नाही? छगन भुजबळ हे जोतिबा फुले यांच्या समतेची ज्योत घेऊन राजकारणात उभे आहेत. ते स्वतः सरकारमध्ये आहेत.

प्रश्न फक्त पैशांचा नसून जोतिबा-सावित्रीबाईंची मालिका लोक पाहत नाहीत हे दुर्दैव आहे. लोकांनी महाभारत, रामायण पाहिलं. लोक छत्रपती संभाजी, पेशव्यांवरील मालिका पाहात राहिले. पण जोतिबा-सावित्रीबाईंची महती लोकांपर्यंत पोहोचविण्यात तंत्र कमी पडले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील मालिकाही लोकांनी पाहिली. जोतिबांमुळेच नवा महाराष्ट्र जन्माला आला. जोतिबांनी ज्या समाजाला जागृत केले, माणूस बनविले त्या बहुजन समाजाचे प्रतिनिधी नव्या महाराष्ट्राचे राज्यकर्ते झाले.

शेतकऱयांच्या, कामकऱयांच्या पुत्रांकडे महाराष्ट्र भूमीचे सूत्रचालन आले. अज्ञान आणि अवमान, दारिद्रय़ व अंधश्रद्धा, रुढी आणि परंपरा यांच्या साखळीने जखडलेल्या मराठीजनांना जीवन – स्वातंत्र्याचा मार्ग ज्यांनी दाखवला त्या जोतिबांच्या कार्याची ही आजची फलश्रुती. स्वतःचे समाजधुरीणत्व टिकविण्यासाठी खोटे आधार, खोटय़ा श्रद्धा निर्माण करणाऱया धर्ममार्तंडांशी प्रखर झुंज देऊन जोतिबांनी हा बहुजन समाज घडविला. त्यांच्या कार्याचे हे यशोमंदिर पाहून प्रत्येक मराठीजनांचे अंतःकरण का उचंबळून येऊ नये? ‘खरा ब्राह्मण’ चित्रपटात प्रबोधनकार ठाकरे यांनी जोतिबा फुले यांची भूमिका केली. त्या प्रबोधनकारांचे नातू आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान आहेत. म्हणून तरी ‘सावित्रीजोती’ बंद पडू नये असे वाटते.

धर्म आणि धंदा जोतिबांनी आपल्या समाजासाठी काय केले नाही? कोणत्याही जातीच्या वाटय़ाला आलेले काम हा त्यांचा धंदा आहे, धर्म नव्हे, हे जोतिबांनी ठणकावून सांगितले. महार, मांगांनाच नव्हे तर सर्व स्त्र्ायांना शिक्षण मिळाले पाहिजे ही कमीत कमी मागणी म्हणून त्यांनी तेव्हाच्या सुशिक्षित म्हणून मिरवणाऱयांपुढे ठेवली. वेदोक्तांचा अधिकार हा सर्वांचा. ब्राह्मणांचीच ती मक्तेदारी नव्हे, हे सांगण्याची हिंमत जोतिबांची. ब्राह्मणांशिवाय त्यांनी विवाह लावले. पुराणांचा फोलपणा दाखवून देवांची रूपे त्यांनी खोटी ठरविली.

देव आणि भक्त यांच्या भेटीमध्ये भटांच्या मध्यस्थीची गरज नाही, असे त्यांनी आवर्जून सांगितले. देव, धर्म, तीर्थस्थाने, धर्मग्रंथ यांच्या नावाने चालविलेल्या भ्रष्टाचाराविरुद्ध त्यांनी एक ज्वलजहाल धर्मयुद्धच पुकारले. 1873 मध्ये ‘सत्यशोधक’ समाजाची स्थापना करून त्यांनी या सर्व चळवळींना एका विशाल सामाजिक क्रांतीचे स्वरूप दिले. आपल्या लेखणीने व वाणीने या सामाजिक क्रांतीचे स्फुल्लिंग त्यांनी असे फुलविले की प्रतिगाम्यांची कोळिष्टके त्यात जळून खाक झाली. परदलितांना त्यातून स्वाभिमानाची प्रेरणा मिळाली. ब्रह्मदेवाच्या निरनिराळ्या अवयवांपासून चातुर्वर्ण्य निर्माण झाले यासारख्या भोळसट कल्पनांना त्यामुळे साफ तडे गेले.

सामाजिक कार्यकर्त्यांची एक नवी पिढी त्यामधून निर्माण झाली. पण जोतिबा-सावित्रीबाईंचा जीवनपट म्हणजे हास्यजत्रा, लाफ्टर चॅलेंजचा प्रकार नाही. या जीवनपटात त्याग, संघर्ष व बलिदान याची किनार आहे. या मालिकेचे काही भाग मी पाहिले. कसदार लेखन, दिग्दर्शन, सादरीकरण व उत्तम अभिनय कलाकारांनी केलाय. जिवंत असताना फुले दाम्पत्यावर कर्मठ लोकांनी दगड मारले. त्यातूनही ते उभे राहिले. ते ब्रिटिश सरकारविरोधात लढत राहिले. ती लढाई विचारांची होती. फुले दाम्पत्याची लढाई अद्याप संपलेली नाही. जोतिबा-सावित्रीबाईंना आणखी किती संघर्ष करावा लागेल?

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!