🕒 1 min read
मुंबई : टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली याला शनिवारी हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सौरव गांगुलीवर अँजिओप्लास्टी करण्यात आली. ती यशस्वी झाली असून त्याची प्रकृती स्थिर आहे. तर सौरव गांगुलीची करोना चाचणीही करण्यात आली. त्या चाचणीचा अहवालही निगेटिव्ह आला आहे.
गांगुलीला उपचारांसाठी कोलकातामधील वुडलॅंड्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयातील सूत्रांनुसार गांगुलीची प्रकृती आता स्थिर आहे. गांगुलीला जीममध्ये वर्कआऊट करताना त्रास जाणवू लागला. यानंतर गांगुलीने वुडलॅंड्स रुग्णालयात तपासणी करुन घेतली. तपासणीत छातीत गंभीर त्रास असल्याचं निदान झालं.
सौरव गांगुलीची पहिली एन्जियोप्लास्टी करण्यात आली आहे. यामध्ये त्याच्या हृदयाच्या रक्तवाहिनीत एक स्टेन टाकण्यात आली आहे. गांगुलीच्या हृदयातील तीन रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज आहेत. एका रक्तवाहिनीत 90 टक्के ब्लॉकेज आहे. सर्जरीनंतर त्याची प्रकृती स्थिर आहे. पुढील काही दिवसांत त्याच्या हृदयात आणखी दोन स्टेंट्स टाकले जाऊ शकतात.
महत्वाच्या बातम्या
- तैमुरच्या मित्राला शुभेच्या देत करीनाने शेअर केला गोंडस फोटो
- उदयनराजेंचा शब्द राखला ! तब्बल ‘इतक्या’ ग्रामपंचायत झाल्या बिनविरोध
- ‘त्यांचा नेम चुकला आणि बाण धनुष्यातचं घुसला…’
- कोहली-रहाणेच्या तुलनेवर सचिनचे भाष्य
- लक्षात येतेय का थयथयाटाचे कारण? भाजप नेत्याचा राऊतांवर हल्लाबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
