Share

‘युरो कप’चा फिवर पोहोचला क्रिकेटच्या मैदानात; इंग्लंड-श्रीलंका सामन्यात आली प्रचिती

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बांग्लादेशविरुद्धची मालिका गमावल्यानंतर इंग्लंडमध्ये श्रीलंकेच्या अपयाशाची मालिका सुरुच आहे. 24 जुन रोजी झालेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात इंग्लंडने श्रीलंकेचा 5 गडी राखुन विजय मिऴवला. पावसाच्या व्यत्ययामुळे या सामन्याचा निकाल हा डकवर्थ लुईस या नियमाच्या आधारे लावण्यात आला.

यादरम्यान ब्रीटनमध्ये युरो कप स्पर्धा सुरु आहे. संपुर्ण जगभरात युरो कपचा फिवर चढलेला आहे. त्यातच श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात इंग्लंडच्या गोलंदाजाने फुटबॉल कौशल्य दाखवत फलंदाजाला बाद केले. या सामन्यातील इंग्लंडकडुन दुसरे षटक सॅम करन टाकत होता. या षटकातील तिसरा चेंडु अविष्का फर्नांडोने जागीच खेळला आणि चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला. मात्र यादरम्यान गोलंदाज सॅम करनने पुढे येत फुटबॉल कौशल्य पणाला लावुन बॉलला किक मारली आणि चेंडु थेट यष्टीवर जाऊन आदळला आणि नॉन स्ट्रायकर एन्डचा फलंदाज धनुष्का गुणातिलाका धावबाद झाला.

सॅम करन हा आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सकडुन खेळत आसतो. सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी हा देखील फुटबॉलचा चाहता आहे. क्रिकेटमध्ये येण्यापुर्वी धोनी फुटबॉल खेळायचा. यादरम्यान युरो कप स्पर्धेचे साखळी फेरीचे सर्व सामने संपले आहेत. इंग्लंडचा फुटबॉल संघदेखील बाद फेरीत दाखल झाला आहे. यादरम्यान श्रीलंकेविरुद्ध मिळवलेल्या सलग दुसऱ्या विजयानंतर इंग्लंडने टी-२० मालिका जिंकली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!