🕒 1 min read
नागपूर : अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. हाताशी आलेलं पीक गेल्याने शेतकरी हवाल दिल झाले आहेत. गुलाब चक्रीवादळाच्या परिणामामुळे झालेल्या अतिवृष्टीने मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यात गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आहे. गावंच्या गावं पाण्यात गेल्याने अनेक संसार देखील उध्वस्त झाले आहेत.
अशात शेतकऱ्यांसह नुकसानग्रस्तांना तातडीने आणि भरीव मदत करावी अशी मागणी भाजप नेत्यांनी केली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत कळकळीची मागणी केली आहे. दरम्यान, मदतीबाबत आज राज्याचे मदत व पुनर्वसन आणि आपत्ती निवारण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषद घेऊन भाष्य केलं आहे.
मराठवाड्यातील ८० टक्के पंचनामे पूर्ण झाले असून पाऊस ओसरला की १०० टक्के पंचनामे पूर्ण होतील. हे पंचनामे पूर्ण झाल्यावर नुकसानाच्या अधारावर काही जिल्ह्यात की संपूर्ण महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करायचा हे ठरवले जाणार असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. यासोबतच, संकटाच्या काळात शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत करायला हवी, ही सर्वच पक्षांची मागणी असते. सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांचाही तसा आग्रह असतो. केवळ भाजप मागणी करतोय किंवा त्यांनीच केली पाहिजे असं काही नाही, असा टोला देखील वडेट्टीवार यांनी भाजप नेत्यांना लगावला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- गोव्यात शिवसेनेची सत्ता आल्यास महाराष्ट्राप्रमाणे कामगिरी करून दाखवू – संजय राऊत
- आम्हाला कोणत्याही युतीची गरज नाही, आमची पक्षबांधणी उत्तम; संजय राऊत कडाडले
- भारतीय लष्कराच्या गौरवशाली आणि अभिनास्पद कामगिरीचे दर्शन घडवणारे मुंबईत उभे राहणार लष्करी संग्रहालय
- राज ठाकरेंनी ‘ती’ मागणी केली म्हणजे काही मोठं काम केलं नाही – गुलाबराव पाटील
- ‘मुख्यमंत्री किती मिनिटांचा मराठवाडा दौरा करतात हे पाहावे लागेल’, मनसेचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

