पणजी : पुढील वर्षी गोवा विधानसभेच्या निवडणुका आहेत. गोव्यासह अन्य पाच राज्यांच्या निवडणुका देखील होणार आहेत. या सर्व राज्यांच्या निवडणुकांसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. दरम्यान, शिवसेना देखील महाराष्ट्राबाहेर आपली ताकद वाढवण्यासाठी निवडणुका लढत आहे. बिहारनंतर आता उत्तर प्रदेश आणि गोव्यातही शिवसेना लढणार असल्याचं समोर येत आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत हे गोवा दौऱ्यावर असून यावेळी त्यांनी शिवसेना गोवा विधानसभेच्या २२ जागा लढवणार, अशी घोषणा केली आहे. गोव्यात शिवसेनेची सत्ता आल्यास महाराष्ट्राप्रमाणे कामगिरी करून दाखवू, असा विश्वास देखील राऊत यांनी व्यक्त केला आहे. तर त्यांनी सध्या सत्तेत असलेल्या भाजप सरकारवर देखील निशाणा साधला आहे.
‘शिवसेना आणि गोव्याचे भावनिक नाते आहे. विजय सरदेसाई, वेलिंगकर यांची भेट घेणार आहे. नवे आणि जुने पक्ष कार्यकर्ते या दौऱ्यात मला भेटणार आहेत. महाराष्ट्रामध्ये शिवसेना ज्या पद्धतीने काम करत आहे, आम्ही त्याच पद्धतीने गोव्यात काम करु,’ असा शब्द देखील संजय राऊत यांनी दिला आहे.
त्यांनी भाजप सरकारवर देखील शरसंधान साधलं आहे. ‘कोरोनाकाळात गोव्याची अवस्था वाईट झाली आहे. ड्रग्समाफियांच्या ताब्यात गोवा अडकला आहे. भाजप फारच थापा मारत आहे. त्यासाठी तिकडे जाणे गरजेचे आहे. महाराष्ट्र आणि गोव्याची तुलना करता येणार नाही. भाजपने गोव्यात अनेकदा तोडफोड करत सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे त्यांना धडा शिकवण्याची इच्छा जनतेची आहे आणि ते शिवसेनाच करू शकते,’ असा हल्लाबोल देखील संजय राऊत यांनी केला.
महत्त्वाच्या बातम्या
- गंगापूर तालुक्यात पावसाने दाणादाण, नदीकाठच्या गावांना हाय अलर्ट!
- महात्मा गांधींचे विचार सामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी भाजपा तर्फे राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन
- भारतीय लष्कराच्या गौरवशाली आणि अभिनास्पद कामगिरीचे दर्शन घडवणारे मुंबईत उभे राहणार लष्करी संग्रहालय
- ‘माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग देश सोडून फरार?’, अजित पवारांनी दिले उत्तर
- ‘मुख्यमंत्री किती मिनिटांचा मराठवाडा दौरा करतात हे पाहावे लागेल’, मनसेचा टोला


