Share

आम्हाला कोणत्याही युतीची गरज नाही, आमची पक्षबांधणी उत्तम; संजय राऊत कडाडले

Published On: 

🕒 1 min read

पणजी : पुढील वर्षी गोवा विधानसभेच्या निवडणुका आहेत. गोव्यासह अन्य पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका देखील होणार आहेत. या सर्व राज्यांच्या निवडणुकांसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. दरम्यान, शिवसेना देखील महाराष्ट्राबाहेर आपली ताकद वाढवण्यासाठी निवडणुका लढत आहे. बिहारनंतर आता उत्तर प्रदेश आणि गोव्यातही शिवसेना लढणार असल्याचं समोर येत आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत हे गोवा दौऱ्यावर असून यावेळी त्यांनी शिवसेना गोवा विधानसभेच्या २२ जागा लढवणार, अशी घोषणा केली आहे. आज माध्यमांशी बोलताना त्यांनी गोव्यात सत्तेत असलेल्या भाजपवर देखील हल्लाबोल केला. तसेच, निवडणुकीसाठी युती-आघाडी यांची आम्हाला गरज नसल्याची गर्जना देखील राऊत यांनी केली आहे.

‘शिवसेना २२ जागांवर निवडणूक लढणार आहे. आम्ही गोव्यातील निवडणुकीमध्ये पूर्ण ताकदीने उतरणार आहोत. आम्हाला कोणत्याही युतीची गरज नाही. आमची पक्षबांधणी उत्तम आहे. तर कोलकात्यामधील तृणमूल गोव्यात निवडणूक लढवू शकते, तर गोवा महाराष्ट्राच्या शेजारीच आहे. आम्ही महाराष्ट्रामध्ये कशी कामगिरी केलीय हे तुम्ही पाहू शकता,’ असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!