🕒 1 min read
औरंगाबाद : मैत्री करण्यास नकार दिल्याने तरुणीला फोन करून शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना औरंगाबाद शहरात घडली. याप्रकरणी विवाहित तरुणाला मुकुंदवाडी पोलिसांनी अटक केली. शेख आमेर शेख इसाक ऊर्फ अम्मू (२९, रा. फातेमानगर, हर्सूल) असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, २२ वर्षीय तरुणीची दोन वर्षांपूर्वी पीडितेची आरोपी शेख आमेरशी ओळख झाली. १३ एप्रिल २०१८ रोजी आरोपीने पीडिता राहत असलेल्या परिसरात येऊन तिच्याशी बळजबरी मैत्री केली. मात्र, त्याने तो विवाहित असल्याची बाब पीडितेपासून लपवून ठेवली. त्यामुळे त्या दोघांची घनिष्ठ मैत्री झाली. पीडितेला आरोपी हा विवाहित असल्याची माहिती मिळाल्याने पीडितेने आरोपीशी संपर्क कमी केला.
फेब्रुवारी २०२१ मध्ये आरोपीने पीडितेला फोनवर बोलून हर्सूल येथे भेटण्यासाठी बोलावून घेतले. त्यावेळी त्याने तू मला इग्नोअर का करते असा प्रश्न केला. त्यावर पीडितेने माझ्यासाठी स्थळ पाहणे सुरू असल्याने आपण भेटणे योग्य नसल्याचे सांगितले. त्यामुळे चिडलेल्या शेख आमेरने पीडितेला मारहाण करून विनयभंग केला.
पीडितेचे लग्न जमल्याची माहिती मिळाल्यानंतर आरोपी शेख आमेरने पीडितेच्या वडिलांना फोन करून शिवीगाळ केली. तसेच, पीडितेला मित्र-मैत्रणींच्या इन्स्टाग्रामवर फोटो टाकून बदनामी करण्याची धमकी देत होता. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्यावर विविध ठाण्यांत अनेक गुन्हे दाखल आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोना मृत्यूचं पाप मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच नाही का ? – आशिष शेलार
- नेहा आणि रोहनप्रीत मारामारी करत असल्याचा व्हीडिओ समोर; काय आहे नेमकं कारण ?
- व्हेंटिलेटरच्या मुद्द्यावरून खा.जलील आणि भाजप आ.सावेंमध्ये खडाजंगी
- दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनिअर एनटीआरला कोरोनाची लागण; ट्वीट करत दिली महिती
- राज्याच्या किनारपट्टीवर धडकणार चक्रीवादळ;मच्छिमारांना सर्तकतेचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

