Share

‘सरकार पाच वर्षे टिकणार हे तुम्हाला नेहमी का सांगावे लागते?’, शेलारांचा राऊतांना खोचक सवाल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी औरंगाबाद येथील जाहीर कार्यक्रमात केलेलव्या विधानानंतर शिवसेना-भाजपच्या युतीची जोरदार चर्चा रंगली. तसेच राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण आले. शिवसेना आणि भाजपची खरंच युती होणार का? या प्रश्नावर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत प्रतिक्रिया दिली आहे.

‘हे सरकार पूर्णपणे पाच वर्षे चालणार. शिवसेना शब्दाची पक्की आहे. शिवसेना कधी विश्वासघात करत नाही. शिवसेना पाठीत खंबीर खुपसत नाही. शिवसेना दिलेला शब्द मोडत नाही त्यामुळे हे सरकार पडेल. नवीन गठबंधन होईल या भ्रमात कुणीही राहू नये. कुणाला पतंग उडवत बसायचे असेल तर त्यांनी उडवावी तो पतंग कधी कापायचा हे आम्हाला माहिती आहे असे म्हणत संजय राऊतांनी शिवसेना-भाजप युती होणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

या स्पष्टीकरणानंतर भाजप नेते आशिष शेलार यांनी शिवसेना आणि संजय राऊत यांच्यावर खोचक टीका केली आहे. ‘जो माणूस आपले पाप लपवायला बघतो, तो दिखाऊपणे का होईना पण बोलतो. संजय राऊतही तेच करत आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या नावावर मते मिळवायची आणि जिंकून आल्यावर दुसरीकडे जायचे. तुमचे सरकार पाच वर्षे टिकणार असेल तर तुम्हाला सतत बोलावे का लागते. सरकार पाच वर्षे टिकणार हे सांगणे म्हणजे आपला दुबळेपणा लपवण्याचा प्रयत्न आहे. तुम्ही दुबळे आहात. त्यापासून पळण्याचा प्रयत्न म्हणजेच राऊतांचे वक्तव्य असल्याचा टोला आशिष शेलार यांनी लगावला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!