Share

गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुकांना परवानगी, राज्य शासनाचे आदेश

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : निवडणूक नियमावली आणि कोरोनामुळे गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या २५० व त्यापेक्षा कमी सभासद असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या (हाउसिंग सोसायट्या) निवडणुकांवरील निर्बंध सरकारने अखेर उठवले. त्यानुसार या निवडणुकीस पात्र असलेल्या सर्व गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुका त्वरित सुरू करण्याचे आदेश सहकार विभागाने दिले आहेत.

महाराष्ट्रात २५० पेक्षा कमी सदस्य संख्या असलेल्या ७० ते ७५ हजार गृहनिर्माण संस्था आहेत. या निवडणुका सोसायटीनेच घ्यायच्या आहेत. २५० व त्यापेक्षा कमी सभासद असलेल्या गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुका घेण्याचे अधिकार सहकार निवडणूक प्राधिकरणाऐवजी संबधित सोसायटीलाच देण्याचा निर्णय सरकारने तीन वर्षांपूर्वी घेतला होता. मात्र, त्यासाठीची नियमावली तयार नसल्याने निवडणुका कशा घ्यायच्या, असा प्रश्न सहकारी संस्थांसमोर निर्माण झाला होता.

ऑक्टोबर २०१९मध्ये सहकार विभागाने निवडणुकीबाबतची नियमावली तयार करून त्यावर जनतेच्या हरकती- सूचना मागवल्या. त्यावर गृहनिर्माण संस्थांनी मोठ्या प्रमाणात सूचना नोंदवल्या. त्यानुसार मूळ नियमावलीत अनेक सुधारणा करून अंतिम नियमावली फेब्रुवारी-मार्च दरम्यान मंजूर करण्यात आली. या निवडणुका सोसायटीनेच घ्यायच्या असून ज्या सभासदाला निवडणूक लढवायची नाही त्याला निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्त करता येईल किंवा सहकार विभागाने तयार के लेल्या पॅनलवरील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून निवडणूक घेता येतील.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!