Share

‘नारायण राणे म्हणजे दुतोंडी साप’, नीलम गोऱ्हेंचा शाब्दिक बाणांतून हल्ला

Published On: 

मुंबई : बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाच्या शुद्धीकरणावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शुक्रवारी शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला. ‘मला राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी परवानगी द्यावी मी माझ्या पैशाने दोन महिन्यात दर्जेदार स्वरूपाचं बाळासाहेब ठाकरे यांच स्मारक बांधून दाखवील’ अशी घोषणाच राणेंनी केली. ‘३२ वर्षात फक्त मुंबईची अवस्था बकाल सारखी झाली. मुंबई शहराला जागतिक किर्तीच शहर अजून बनवण्यात आल नाही. देशात सर्वाधिक कोरोना बाधितांचा मृत्यू फक्त एकट्या महाराष्ट्रात झाला. माझ्या आयुष्यात पहिले असे मुख्यमंत्री असतील ते घरात बसून काम करत आहेत, अशी टीका राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर केली.

राणेंच्या या टीकेला शिवसेना नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘बाळासाहेबांबद्दल आदर आणि उद्धव ठाकरेंविषयी गरळ, हे तर दुतोंडी साप आहेत’, अशा शाब्दिक बाणांनी त्यांनी राणेंवर निशाणा साधला. त्या म्हणाल्या, ‘एका बाजूला बाळासाहेबांबद्दल आदर व्यक्त करायचा आणि दुसऱ्या बाजूला ज्यांना शिवसेनाप्रमुखांनी राज्याची सेवा करण्यासाठी आशीर्वाद दिले होते, त्या उद्धव ठाकरेंविषयी सातत्याने गरळ ओकायची म्हणजे दुतोंडी सापासारखे ह्यांचे वर्तन आहे.’

देवेंद्र फडणवीस यांनी राणेंचे समर्थन केले ही त्यांची मजबुरी आहे. ते नारायण राणे यांच्यामागे फरफटत जात आहेत. ह्या फरफटत जाण्याचा अर्थ काही दिवसांत त्यांच्या लक्षात येईल. आमच्यावर बोलत राहिल्याशिवाय नारायण राणेंना मीडिया प्रसिद्धी देत नाही म्हणून ते रोज बोलतात, असा टोलाही राणेंना लगावला. कोरोना काळात ज्या प्रकारची सेवा शिवसेनेने केले ते कधीच कुणी नाकारणार नाही. मंत्री पद मिळाले म्हणून सतत बोलत राहून लोकांची दिशाभूल करत राहणे एवढाच त्यांचा अजेंडा आहे. मराठीत म्हण आहे ‘उथळ पाण्याला खळखळाट फार’ तशा पद्धतीचं त्यांचं बोलणं आहे, असंही नीलम गोऱ्हे म्हणाल्या.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!