जालना: कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून राज्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे. कोरोना रुग्णांची मोठ्या प्रमाणात वाढत असून या वाढत्या रुग्णसंख्येमुळे रुग्णालयांमध्ये वैद्यकीय सुविधा अपुऱ्या पडत आहेत. वैद्यकीय सुविधांचा तुटवडा जाणवत असल्याने अनेक रुग्णांचे हाल होत असून नवीन रुग्णांना खाटा उपलब्ध होत नाहीयेत. याच सोबत लसींचा देखील तुटवडा असून रेमेडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार देखील होत आहे, अशा एकंदरीत परिस्थितीमुळे राज्यभरात चिंतेचे वातावरण पसरले आहे. मात्र अशा परिस्थितीत देखील राजकीय नेत्यांचं राजकारण सुरूच असल्याचं बघायला मिळत आहे.
राज्य सरकार केंद्राची बदनामी करत असुन राज्य सरकार स्वत:चं पाप झाकण्याचं प्रयत्न करत आहे, अशी टीका भाजपचे आमदार आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी केली आहे. केंद्रसरकारवर वारंवार टीका करण्यापेक्षा राज्यसरकारने लस का बुक केली नाही? लॉकडाऊन जाहीर केल्या नंतर जनतेला पॅकेज जाहीर न करणाऱ्या सरकारला जनता माफ करणार नाही, असेही त्यांनी सोशल मिडिया वरील एका व्हिडीओच्या माध्यमातून राज्यसरकारवर टीका करताना बोलले आहेत. तसेच राज्यातील रेमडेसेविर इंजेक्शनचा काळाबाजार वर भाष्य केलं आहे. राज्य सरकारने जालना जिल्ह्यासाठी दहा हजार रेमडेसेविर इंजेक्शन दिले, असे मंत्र्यांनी सांगितले परंतु अद्याप इंजेक्शनचा तुटवडा आहे तर कुठे गेले इंजेक्शन, असा सवाल आ. लोणीकर यांनी विचारला आहे.
ज्या खासगी डॉक्टरांनकडे रेमडेसेविरचा कोटा आहे तेच काळाबाजार करत असून चोरांना मदत करतात आश्या बातम्या दररोज येत आहे. लोणीकर म्हणाले, सिव्हिल हॉस्पीटल मध्ये कोटा उपलब्ध नाहीये, म्हणुन राज्यातील मंत्री रोज खोटं बोलतात, खोटी माहिती सांगतात मात्र, राज्य सरकार केंद्राची बदनामी करत असुन राज्य सरकार स्वत:चं पाप झाकण्याचं प्रयत्न करत आहे. परंतु महाराष्ट्रातील बारा कोटी जनता या महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला माफ करणार नाही, अशी टीका लोणीकारांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- बेपत्ता झालेल्या भोळसर महिलेला केले कुटुंबीयांच्या स्वाधीन
- ‘विदेशात लस दिल्याने आपल्याकडे कमतरता’, अजित पवारांचा मोदी सरकारवर निशाणा
- पंतप्रधान आपल्यातच व्यस्त राहिले आणि नागरिक गुदमरले, परदेशी माध्यमांची मोदींवर सडकून टीका
- कोरोनाच्या संकटसमयी संत निरंकारी मंडळाचा पुढाकार
- ‘जीएसटी’ संकलनात विक्रमी वाढ, ३ वर्षात पहिल्यांदाच १.४१ लाख कोटींवर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

