Share

बेपत्ता झालेल्या भोळसर महिलेला केले कुटुंबीयांच्या स्वाधीन

Published On: 

औरंगाबाद : तीन महिन्या पासून फर्दापूर ता.सोयगाव परीसरात भटकंती करीत असलेल्या ५५ वर्षीय भोळसर महिलेच्या कुटुंबाचा शोध घेऊन महिलेला तीच्या कुटुंबाच्या स्वाधीन करण्याची कौतुकास्पद कामगिरी फर्दापूर पोलिसांनी केली. भोळसर महिला व तिच्या कुटुंबीयांची पून्हा एकदा गाठभेट घडवण्यात पो.अमलदार संजय कोळी यांनी मौलाची भूमिका बजावली आहे.

या बाबत सविस्तर वृत्त असे की भोळसर महिला कमलबाई फुलसिंग सोनवणे(वय ५५ रा.नवडणी ता.साक्री जि.धुळे ) ही ऑक्टोबर मध्ये मुलगा गणेश मुलगी संजना,सून सविता व जावई चंदू यांच्या सह विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना माढा येथे ऊसतोडणी साठी गेली होती.

दरम्यान भोळसर महिला व तिचे कुटुंबीय मानेगाव (ता.माढा जि.सोलापूर) येथे ऊसतोडणी करीत असतांना भोळसर महिला कमलबाई व मुलगा गणेश हे दोघे माणगाव येथील आठवडी बाजारात गेले असता मानेगाव येथील आठवडी बाजारातून भोळसर कमलाबाई बेपत्ता झाली या प्रकरणी मुलगा गणेश फुलसिंग सोनवणे याने १५ फेब्रुवारी रोजी त्याची आई कमलबाई ही बेपत्ता झाल्याची फिर्याद माढा पोलिसांना दिली होती.

दरम्यान मानेगाव येथून बेपत्ता झालेली कमलाबाई भटकंती करीत फेब्रुवारी च्या शेवटच्या आठवड्यात फर्दापूर येथे येवून पोहचली या बाबतची माहिती फर्दापूर पोलिसांना मिळाल्याने पोउनि युवराज शिंदे अमलदार नारायण खोडे,संजय कोळी यांनी भोळसर कमलाबाई हिस जेवण देवून तिची विचारपूस केली मात्र भोळसर कमलबाई कडून कोणतीही माहिती पोलिसांना मिळाली नाही. परंतु कमलबाई यांच्या बोलण्यात वारंवार साक्री तालूक्याचा उल्लेख झाल्याने हा धागा पकडून पोलिस अमलदार संजय कोळी यांनी साक्री तालूक्यातील व्हाटस ॲप गृपवर कमलबाई बाबत माहिती टाकून त्यांच्या कुटुंबीयांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.

मात्र त्याचा फारसा उपयोग झाला नाही दरम्यान पो.अमलदार संजय कोळी यांना एका व्हाटस ॲप गृपवरुन भोळसर कमलबाई माढा तालुक्यातील मानेगाव येथून बेपत्ता झाल्याची माहिती मिळाल्याने सदरील माहितीच्या आधारे त्यांनी कमलबाई यांच्या नातेवाईकांना संपर्क साधून सदरील वर्णनाची महिला फर्दापूर येथे असल्याचे सांगितले,या पार्श्वभूमीवर कमलबाईच्या नातेवाईकांनी ओळख पटविल्याने दि.29 गुरुवारी सायंकाळी सा.फौ पोपटराव कांबळे अमलदार बाजीराव धनवट,संजय कोळी यांनी भोळसर कमलबाई यांना नडवणीचे सरपंच भगवान ठाकरे, जावई चंद्रकांत माळचे बहीण विमलाबाई पवार यांच्या ताब्यात दिले.

तीन महिने केला नातेवाईकांचा शोध

पोलिस अमलदार संजय कोळी यांनी न थकता सतत तीन महिने कमलबाई यांच्या नातेवाईकांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरु ठेवले त्यांच्या या प्रयत्नामुळेच कमलबाई व त्यांच्या कुटुंबीयांची पून्हा भेट झाली व संजय कोळी यांच्या रूपाने कमलबाई व त्यांच्या नातेवाईकांना खाकीतील माणुसकीचे दर्शन झाले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!