नवी दिल्ली : वस्तु आणि सेवा कर म्हणजेच जीएसटी संकलन विक्रमी पातळीवर पोहोचले आहे. एप्रिल महिन्यात या माध्यमातून १ लाख ४१ हजार ३८४ कोटी रुपये सरकारी तिजोरीत जमा झाले आहेत. सरकारच्या वतीने शनिवारी ही आकडेवारी जारी करण्यात आली. जुलै २०१७ मध्ये भारतात जीएसटी प्रणाली लागू करण्यात आली होती.तेव्हापासूनच्या जीएसटी संकलनाचा विचार करता, हा आकडा सर्वाधिक आहे. त्या आधी गेल्या मार्च महिन्यात सर्वाधिक १.२४ लाख कोटी रुपयांचा जीएसटी जमा झाला होता.
सरकारच्या वतीने देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार यामध्ये केंद्र सरकारची भागीदारी २७,८३७ कोटी रुपये होती. तर राज्यांची ३५,६२१ कोटी रुपयांची होती. आयजीएसटीच्या माध्यमातून ६८,४८१ कोटी रुपयांचे संकलन झाले. यात आयात वस्तूंच्या माध्यमातून २९ हजार ५९९ कोटी तर सेसच्या माध्यमातून ९,४४५ कोटी रुपयांचे संकलन झाले आहे.
✅The gross GST revenue collected in the month of April’ 2021 is at a record high of Rs. 1,41,384 crore
✅The GST revenues during April 2021 are the highest since the introduction of GST
(1/2)
Read more➡️ https://t.co/GymAhrdw5Y pic.twitter.com/jN6ER9kJP8— Ministry of Finance (@FinMinIndia) May 1, 2021
देशात कोरोनाची दुसरी लाट सध्या सुरू आहे. अशा परिस्थितीत अनेक राज्यांमध्ये कोरोना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र, गुजरात, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू या राज्यांत सर्वात जास्त रुग्ण संख्येत वाढ असताना या राज्यांमधूनच सर्वाधिक संकलन झाले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘..मग इतक्या दिवस तुम्ही काय केले?’, चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
- ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे भाषण म्हणजे भुलभुलय्या’, भाजपचा टोला
- ‘पाणी डोक्यावरून गेलेय, तत्काळ ऑक्सिजन द्या’, हायकोर्टाने मोदी सरकारला झापले
- एका लग्नाची अशीही गोष्ट! विवाहाच्या रात्रीच करवलीसह नवरी फरार
- चक्क पोलीस अधिकाऱ्याच्या घरी चोरी, सव्वा लाखांचा ऐवज लंपास


