औरंगाबाद : २४ एप्रिल हा दिवस मानव एकता दिवस म्हणुन साजरा करण्यात येतो. या दिवशी मंडळाचे पूर्व सद्गुरू बाबा गुरुबचन सिंह जी यांनी मानवतेसाठी बलिदान दिले होते. त्यांना श्रद्धांजली म्हणून संपूर्ण विश्वभर रक्तदान शिबिरांचे आयोजन मंडळातर्फे करण्यात येत असते.
याच अनुषंगाने सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली दि १ मे शनिवार रोजी मंडळाच्या सिडको व सिंधी कॉलोनी शाखेतर्फे दोन्ही भवनामध्ये सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या रक्तदान शिबिरामध्ये २३२ दात्यांनी उस्फूर्तपणे रक्तदान केले. हे सर्व रक्तदान शासकीय विभागीय रक्तपेढी तर्फे संकलित करण्यात आले. घाटीत सुद्धा रक्ताचा खूप तुटवडा असल्याने व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळ्या सरकारी नियमांचे पालन करत झालेल्या या शिबिरामध्ये उस्फूर्तपणे सहभागी झालेल्या सर्व रक्तदात्यांचे मंडळाचे विभागीय प्रमुख कन्हैय्यालाल डेब्रा व सिडको शाखेचे मुखी डी.जी.दळवी यांनी आभार व्यक्त केले. या कार्यक्रमा साठी सेवादल च्या सदस्यांनी परिश्रम घेतले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘माझ्या कारकीर्दीत मी नेहमीच असा कारनामा करण्याचा प्रयत्न केला पण…’ सेहवाग कडून पृथ्वी शॉचं कौतुक
- ‘महाविकास आघाडीची शेतकऱ्यांच्या बांधावर बि – बियाणे योजना हवेत विरली’
- ‘बचपन के बिछडे आयपीएलमे मिले’ अनुष्का शर्मा आणि साक्षी धोनी होत्या ‘स्कूलमेट’
- एवढा बेजबाबदार पंतप्रधान जगात आतापर्यंत कुठेच झाला नाही-पटोले
- मोठी बातमी : भारतातून ‘या’ देशात गेल्यास 5 वर्षांचा कारावास
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

