Share

सुशांतप्रकरणी मला समन्स, करण जोहरला का नाही? कंगना राणौत भडकली

Published On: 

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपुतच्या मृत्यूवरुन बॉलिवूडमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा खेळ सुरु झाला आहे. यामध्ये अभिनेत्री कंगना रनौत सर्वाधिक चर्चेत आहे. बॉलिवूड कलाकारांची नावं घेऊन ती आरोप करत आहे. दरम्यान सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी करण जोहरच्या मॅनेजरची चौकशी करणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल दिली आणि यानंतर कंगना राणौत भडकली. यावादात आता तिने थेट राज्याचे पर्यावरण मंत्री व शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांना ओढलं आहे.

कंगनाने आपल्या टीमच्या ट्विटर हँडलवरुन जोरदार आरोप केले आहेत. “मुंबई पोलीस बेधकडकपणे पक्षपात करत आहेत. मला चौकशीसाठी बोलावण्यात आलं. पण करण जोहरची चौकशी अद्याप झालेली नाही. त्याऐवजी पोलिसांनी त्याच्या मॅनेजरला समन्स पाठवलं. असं का? कारण साहेबांना त्रास होऊ नये म्हणून का? अशा आशयाचं ट्विट करुन कंगनाने आपला संताप व्यक्त केला. त्यानंतर तिने आणखी एक ट्विट केलं या ट्विटमध्ये तिने थेट आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. “करण जोहर हा आदित्य ठाकरे यांचा खास मित्र असल्यामुळे त्याला चौकशीसाठी बोलावण्यात आलं नाही. त्याऐवजी त्याच्या मॅनेजरची चौकशी झाली. सुशांतच्या हत्येची थट्टा करणं थांबवा.” अशा आशयाचं ट्विट तिने केलं.

दरम्यान, सुशांतच्या मृत्यूप्रकरणी सध्या मुंबई पोलिसांवर संशय व्यक्त केला जात आहे. ही केस पोलिसांऐवजी CBI कडे सोपवण्यात यावी अशीही विनंती सध्या जोर धरु लागली आहे. या पार्श्वभूमीवर कंगनाचे हे ट्विट सध्या चर्चेत आहेत.

#व्यक्तीविशेष : उद्धव ठाकरे – एक छायाचित्रकार मुख्यमंत्री कसा बनला ?

…ते शक्य नसल्यास इगतपुरीमध्ये जावून विपश्यना करावी; पाटील, फडणवीसांना आंबेडकरांचा खोचक सल्ला

चंगू-मंगूची मुलाखत बघितली, निलेश राणेंनी ठाकरे-राऊत मुलाखतीची उडवली खिल्ली

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!