Share

…ते शक्य नसल्यास इगतपुरीमध्ये जावून विपश्यना करावी; पाटील, फडणवीसांना आंबेडकरांचा खोचक सल्ला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: भाजपाला १०५ आमदार येऊन देखील शिवसेनेची युती तुटल्यामुळे विरोधी पक्षात बसावे लागले. तर, आकड्यांची जमवा-जमव करून शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस या तीन पक्षांचे मिळून महाविकास आघाडीचे सरकार राज्यात आले. भाजपाने वेळोवेळी आक्रमक भूमिका घेत सरकारला घेरण्याची एकही संधी सोडली नाही. राज्यात कोरोना सारख्या महामारीने थैमान घातले असताना महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा अशी राजकीय जुगलबंदी पाहायला मिळत आहे.

आता, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी विरोधी बाकावरील भाजपावर निशाणा साधला आहे. राज्य करोनाच्या संकटातून जात असतानाच राजकीय वर्तुळात राजकीय अस्थिरतेवरून टीकाटिप्पणी सुरू आहे. राज्यात सुरू असलेल्या राजकीय अस्थिरतेच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर  प्रकाश आंबेडकर यांनी फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे.

उद्धवसाहेब आता राष्ट्रीय राजकारणाकडे कूच करा, संजय राऊतांच्या शुभेच्छा

“सत्तेसाठी कासावीस झालेल्या भाजपच्या चंद्रकांत पाटील व देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षे विरोधीपक्ष म्हणून प्रतीक्षा करावी आणि ते शक्य नसल्यास इगतपुरीमध्ये जावून विपश्यना करावी !”,असे ट्विट करत माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील या दोन मुख्य नेत्यांना सल्ला त्यांनी दिला आहे.

आम्हाला काय म्हणायचं हे अजितदादांनी फोटोतून दाखवलं, भाजपच्या मित्रपक्षाचा टोला

तसेच काल प्रकाश आंबेडकर यांनी, ‘उद्धव ठाकरे, विनंती. खुदा होऊ नका. कोरोना व्हायरसने भीती सगळ्यांना घातली. त्यावेळेस मीही भ्यायलो होतो. अमेरिकेच्या हॉपकिन युनिव्हर्सिटीने 40 टक्के लोकबाधित होतील, असे सांगितले. पण त्याच्याच आठवड्याभरानंतर ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञांनी सांगितले की भारतात कोरोना व्हायरस पसरु शकणार नाही. त्यांची रोगप्रतिकार शक्ती फार चांगली आहे. आता ऑस्ट्रेलिया जिंकत असल्याचे दिसत आहे, असे सांगत ‘लॉकडाऊन वाढवू नका’ अशी विनंती देखील केली होती.

सोलापुरी पॅटर्न : कोविड केअर सेंटरमध्ये उपचाराचा अनोखा प्रयत्न

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!