सिंधुदुर्ग: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची संजय राऊत यांनी घेतलेल्या अनलॉक मुलाखतीचा उत्तरार्ध आज प्रदर्शित करण्यात आला. काल व आज अशा दोन भागात प्रसिद्ध केलेल्या मुलाखतीमध्ये अनेक खळबळजनक खुलासे उद्धव ठाकरे यांनी केल्याचा दावा संजय राऊत यांनी केला होता. भाजपाशी केंद्रासह राज्यातील युती तोडल्यानंतर भाजपाच्या देशभरातील राजकारणावर ठाकरेंनी टीका केली आहे.
तर, या मुलाखतीवर भाजपाचे नेते देखील सडकून टीका करत आहेत. संजय राऊत व उद्धव ठाकरे यांचे कट्टर विरोधक मानले जाणारे भाजपाचे नेते निलेश राणे यांनी ट्विटर वरून, “कालची चंगू-मंगू मुलाखत बघितली. मुख्यमंत्री होऊन ६ महिने झाले तरी एक मुख्यमंत्री उत्तरं देतोय असं वाटलं नाही. प्रश्न काय आणि उत्तर भलतीच. दूध उत्पादक आंदोलन, विद्यार्थ्यांच्या परीक्षा, आर्थिक संकटावर उपाय योजना या विचारलेल्या प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांना धड उत्तर देता आले नाही,” अशी खिल्ली उडवत गंभीर प्रश्नांना उत्तर न देता टाळाटाळ केल्याचे आरोप देखील केले आहेत.
शरद पवारांसोबतच्या भेटी हा एक वेगळा अनुभव असतो – उद्धव ठाकरे
कालची चंगू-मंगू मुलाखत बघितली. मुख्यमंत्री होऊन ६ महिने झाले तरी एक मुख्यमंत्री उत्तरं देतोय असं वाटलं नाही. प्रश्न काय आणि उत्तर भलतीच. दूध उत्पादक आंदोलन, विद्यार्थ्यांच्या परीक्षा, आर्थिक संकटावर उपाय योजना या विचारलेल्या प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांना धड उत्तर देता आले नाही.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) July 26, 2020
दरम्यान, मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरेंनी भाजपाला चांगलेच लक्ष्य केल्याचे दिसले. भाजपच्या ऑपरेशन लोटस वर बोलताना, ‘ इरादा असेल नसेल माहित नाही, पण काही जण ऑगस्ट, सप्टेंबर मध्ये सरकार पडेल असं म्हणतात. मी इथेच बसलोय, माझं सरकार आता पाडा. मी काही फेव्हिकॉल लावून बसलेलो नाही. काही जणांना घडवण्यात आनंद असतो तर काहींना बिघडवण्यात असतो,’ अशी खोचक टीका देखील त्यांनी भाजपावर केली. पैश्यांच्या जोरावर व चौकश्यांचा ससेमिरा लावत आमदार फोडून पाडापडी करणे हीच त्यांची लोकशाही आहे असे म्हणत त्यांनी केंद्रापासून ते राज्यातील भाजपा नेत्यांवर निशाणा साधला आहे.
आता, भाजपा महाराष्ट्र राज्य प्रवक्ते विश्वास पाठक यांनी उद्धव ठाकरेंच्या चॅलेंजला स्वतः एक चॅलेंज दिले आहे. पाठक यांनी ट्विट केले आहे ज्यात ते म्हणतात, ‘सरकार पाडून दाखवा? अहो जराशीपण लाज असेल तर सरकार चालवून दाखवा ना!’ यामुळे सरकार चालवण्याचं हे चॅलेंज आता ठाकरे सरकार कितपत पूर्ण करतंय हे देखील महत्वाचं आहे.
मुंबईची लोकल सुरु करू पण….आयुक्त इकबाल चहल यांची भूमिका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

