Share

विश्वचषक जिंकल्यानंतर धोनीने का केले होते मुंडन ? संघ व्यवस्थापकाने दिले ‘हे’ उत्तर

Published On: 

मुंबई : 2 एप्रिलची तारीख भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंदवली गेली आहे. हा दिवस होता जेव्हा महेंद्रसिंग धोनीच्या टीमने  विश्वचषक ट्रॉफी जिंकली. २०११ वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेला पराभूत करून इतिहास रचला. या ऐतिहासिक विजयाला आज 10 वर्षे झाली आहेत. सध्या हा दिवस देशात साजरा केला जात आहे.

यावेळी विश्वविजेतेपदी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने डोके मुंडले होते. धोनीने हे का केले याचे कारण तत्कालीन संघ व्यवस्थापक रणजीब बिस्वाल यांनी सांगितले आहे. रणजीब बिस्वाल यांनी सांगितले की, विजयानंतर पहाटे 4.30 वाजेपर्यंत खेळाडूंनी पार्टी केली होती. आणि आश्चर्य म्हणजे आम्ही सकाळी पाहिले की धोनीने आपले डोके मुंडले आहे. रणजीब बिस्वाल म्हणाले की वर्ल्ड कपच्या प्रवासामधील हा सर्वात धक्कादायक क्षण होता.

तो म्हणाला की अंतिम सामन्यानंतर सकाळी आम्ही धोनीला या रूपात बघू, कोणालाही याची कल्पना नव्हती. रात्री उशिरापर्यंत आम्ही ड्रेसिंग रूममध्ये सेलिब्रेशन करत होतो. त्यानंतर आम्ही सर्वजण आपापल्या खोल्यांमध्ये गेलो. आणि आम्ही सकाळी जे पाहिले ते आश्चर्यचकित करणारे होते. धोनीने डोके मुंडले होते. त्याला पाहिल्यानंतर आम्ही थोड्या वेळासाठी दंग होतो.

बिस्वाल म्हणाले की जोपर्यंत उत्सव सुरू होता तोपर्यंत धोनी आमच्यासोबत होता. नंतर तो त्याच्या खोलीत गेला आणि डोके मुंडले. या योजनेबद्दल त्याने कोणालाही सांगितले नाही. रणजीब बिस्वाल म्हणाले की, धोनी आपल्या भावना आपल्यातच ठेवतो. रणजीब बिस्वाल म्हणाले की, खरे कारण काय होते हे आम्हाला माहिती नाही. बहुदा वर्ल्ड कप सुरू होण्यापूर्वी धोनीने रांची येथील त्याच्या घराजवळील मंदिरामध्ये नवस मागितला असेल.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!