Share

धक्कादायक! जावयाने कोयत्याने केला सासूचा खून

Published On: 

जालना : जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडली असतॆसली तरी प्रशासन या समस्येवर हतबल असल्याचे दिसून येत आहे. अशीच एक घटना जालना येथे घडली. किरकोळ वादाचे पर्यवसान भांडणात होऊन जावयाने पत्नी आणि सासूवर केलेल्या कोयत्याच्या वारामुळे सासूचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे तर पत्नी गंभीररीत्या जखमी झाल्याची घटना तालुक्यातील बाबुलतारा येथे घडली आहे.

बाबुलतारा येथील कविता हिच्याशी २००६ मध्ये त्याचा विवाह झाला होता. पती सोबत होत असलेल्या वादामुळे कविता काही दिवस माहेरी तर काही दिवस सासरी राहत होती. १ एप्रिल रोजी आरोपी संतोष आपल्या पत्नीला भेटायला बाबुलतारा येथे आला होता. सकाळी अंघोळ करून तो बाहेर निघून गेला. पत्नी कविता आणि तिची आई शेजारी लग्न असल्याने तिकडे निघून गेल्या.

रात्री नऊ वाजेच्या सुमारास आरोपी संतोष परत आला आणि “आल्या का लग्नावरून,” असे विचारात पत्नीवर कोयत्याने सपासप वार सुरू केले, आईने सोडविण्याचा प्रयत्न केला असता आईवर देखील जोरजोरात वार केले. वार केल्यानंतर घटनास्थळावरून तो पळून गेला. औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरू असताना २ मार्च रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास सासू रेशम कोळे यांचा मृत्यू झाला. पत्नीच्या फिर्यादीवरून आरोपी संतोष सरोदे याच्या विरोधात परतूर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!