Share

‘ही शेवटची वेळ आहे’ ; कोहलीवर इंग्लंडच्या फलंदाजाचा खेळपट्टीवरुन घाबरवण्याचा आरोप

Published On: 

मुंबई : इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय रविवरी भारत विरुद्ध इंग्लंड संघातील वनडे मालिकेतील तिसरा सामना झाला. या सामन्यात भारताने ७ धावांनी विजय मिळवत मालिका २-१ अशा फरकाने जिंकली आहे. या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराट कोहलीच्या नेतृत्वात भारताने टी -20 मालिका 3-2 आणि कसोटी मालिका 3-1 अशा फरकाने जिंकली.

भारत दौरा संपवून खेळाडू आपल्या मायदेशी परतले आहे. याचदरम्यान, खेळाडू आपल्या याचदरम्यान इंग्लंडचा फलंदाज ओली पोपने भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेविषयी धक्कादायक खुलासा केला आहे. चेन्नईत खेळवण्यात आलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात विराट कोहलीने आपल्याला धमकावल्याचा आरोप पोपने केला आहे. पोपच्या म्हणण्यानुसार भारतीय कर्णधाराने त्याला कसोटी मालिकेतील उर्वरीत तीन सामन्यांसाठीच्या खेळपट्टीवरुन घाबरवण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोप पोपने केला आहे.

पोप म्हणाला की, इंग्लंडचा संघ जेव्हा दुसऱ्या डावात फलंदाजी करत होता तेव्हा खेळपट्टीवर चेंडू चांगलाच टर्न होत होता. मी तेव्हा स्ट्रायकर एंडला उभा होतो. त्यावेळी विराट कोहली माझ्याकडे आला आणि म्हणाला, ही शेवटची वेळ आहे, जिथे तुम्ही सपाट खेळपट्टीवर खेळताय. त्याने मला ताकीदच दिली. त्याक्षणीच मला कळले होते की या मालिकेतील उर्वरित सामन्यांमध्ये फलंदाजी करणे खूप आव्हानात्मक असणार आहे, असा किस्सा पोपने सांगितला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!