Share

Uddhav Thackeray | कर्नाटकच्या प्रश्नावर मुख्यमंत्री गप्प का? ; उद्धव ठाकरे यांचा सवाल

Published On: 

🕒 1 min read

Uddhav Thackeray | मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात रोज काहीतरी नवीन घडताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Chief Minister Basavaraj Bommai) यांनी महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील 40 गावांवर दावा केला होता. अक्कलकोट आणि सोलापूर हे देखील कर्नाटकचाच भाग असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वाद पुन्हा एकदा पेटला. कर्नाटक सरकारने जत तालुक्यातील 40 गावांना पाणी दिले आणि या 40 गावांनी कर्नाटकात विलीन होण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले. त्यामुळे विरोधी नेते एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत आहे. कर्नाटकच्या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गप्प का?, असा सवाल उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी उपस्थित केला आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर उद्धव ठाकरे म्हणाले, “कर्नाटकचे मुख्यमंत्री मुंबईत कर्नाटक भवन बांधता आहेत. बेळगावमध्ये येऊ नका, असे पत्र आपल्या मुख्यमंत्र्यांना पाठवता. मात्र, याविरोधात आपले मुख्यमंत्री ब्र सुद्धा उच्चारत नाहीत. अद्याप मुख्यमंत्री शिंदेंनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. महाराष्ट्राला मिंधे सरकारची फळ भोगावी लागत आहेत.”

महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावाद गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. मात्र सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात पाणी नाही, त्यामुळे कर्नाटक सरकारने तालुक्यातील दुष्काळी भागासाठी पाणी सोडले आहे. कर्नाटक सरकारने जत तालुक्यातील गावांना पाणी देऊन महाराष्ट्र सरकारला आव्हान दिले आहे. या सर्व घटनांनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जतमधील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी तातडीने पावले उचलत दोन हजार कोटी रुपयांची निविदा काढण्याची घोषणा केली आहे.

यादरम्यान जत तालुक्यातील काही लोक मुख्यमंत्री शिंदे यांना भेटण्यासाठी आले होते. तालुक्यातील जनतेच्या समस्या ऐकून घेतल्यानंतर पुढील महिन्यात म्हणजे जानेवारी महिन्यात दोन हजार कोटी रुपयांची निविदा काढू, असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!