Share

IND vs BAN | वनडे मालिकेमध्ये मोहम्मद शमीच्या जागी खेळणार ‘हा’ गोलंदाज

Published On: 

🕒 1 min read

बांगलादेशमध्ये रविवारपासून भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) या संघामध्ये तीन एकदिवसीय (One Day) सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेपूर्वी भारतीय संघाला एक मोठा झटका बसला आहे. भारतीय संघातील महत्त्वाचा गोलंदाज मोहम्मद शमी (Mohommad Shami) खांद्याच्या दुखापतीमुळे बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या संपूर्ण मालिकेतून बाहेर पडला आहे. बीसीसीआयने शमीच्या दुखापती बद्दल माहिती दिली आहे. अशा परिस्थितीमध्ये मोहम्मद शमीच्या जागी उमरान मलिक (Umaran Malik) चा वनडे मालिकेसाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.

बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी बांगलादेश विरुद्धच्या वनडे मालिकेच्या तयारी दरम्यान सराव सत्रात जखमी झाला आहे. त्याच्या खांद्याला दुखापत झाली आहे. शमी सध्या बेंगलोर येथील राष्ट्रीय क्रिकेट ॲकॅडमीमध्ये बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या निगराणीखाली आहे. दरम्यान, शमीच्या जागी उमरान मलिकचा वनडे मालिकेसाठी संघात समावेश करण्यात आला आहे.

न्यूझीलंड विरुद्धच्या टी-20 आणि एकदिवसीय मालिकेमध्ये उमरान मलिक भारतीय संघाचा भाग होता. सामान्यादरम्यान, उमराने टीम इंडियासाठी चांगली कामगिरी केली होती. तर न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या एकदिवसीय मालिकेमध्ये तो टीम इंडियासाठी सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला होता.

बुमराच्या अनुपस्थितीमध्ये बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय सामन्यांमध्ये मोहम्मद शमी भारतीय संघाच्या गोलंदाजीचे नेतृत्व करणार होता. मात्र, मोहम्मद शमीला सामन्यापूर्वी दुखापत झाल्यामुळे त्याच्या जागी उमरण मलिकला हे सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. बांगलादेश आणि भारत यांच्यामध्ये पहिला एकदिवसीय सामना रविवारी ढाका येथे खेळला जाणार आहे.

बांगलादेश आणि भारत यांच्यामध्ये होणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्यासाठी भारतीय संघामध्ये रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), शाहबाज अहमद, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, दीपक चहर, कुलदीप सेन, उमरान मलिक हे खेळाडू आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!