🕒 1 min read
Urvashi Rautela | मुंबई: बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) आणि भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंत (Rishabh Pant) यांच्या अफेअर च्या चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. कारण उर्वशी नेहमी तिच्या सोशल अकाउंटवर आरपी नावाने पोस्ट करायची. जेव्हा उर्वशी या नावावर सोशल मीडियावर काहीही पोस्ट करायची तेव्हा ती रिषभ पंतच्या नावाशी जोडली जायची. अशात उर्वशीने या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. तिने नुकतेच स्पष्ट केले आहे की ऋषभ पंत आणि तिचा काही एक संबंध नाही. हा गैरसमज फक्त आरपी नावामुळे झाला आहे.
ऋषभ पंतसोबत अफेअरच्या चर्चांना उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) ने दिला पूर्णविराम
उर्वशीने नुकताच तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर दक्षिणेतील अभिनेता राम पोथिनेनीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर केल्यानंतर उर्वशीने मीडियाशी बोलताना खुलासा केला की, आरपी म्हणजे तिचा को-स्टर राम पोथिनेनी. तिने त्यावेळी सांगितले की, रिषभ पंतला देखील आरपी म्हणतात हे माहीत नव्हते. हा खुलासा झाल्यानंतर उर्वशी आणि ऋषभच्या अफेअरच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
मीडिया सोबत बोलताना उर्वशी म्हणाली की,”आरपी माझा सह कलाकार आहे आणि त्याचे खरे नाव राम पोथिनेनी आहे. मला माहित नव्हतं की ऋषभ पंतला देखील आरपी म्हणतात. लोकांनी स्वतःहून अंदाज घेत त्यावरून ऋषभ आणि माझ्यावर लिहायला सुरुवात केली. त्याचबरोबर आजकाल कुणी सोशल मीडियावर काहीही लिहिले तरी लोक त्यावर सहजपणे विश्वास ठेवतात.”
या संभाषणामध्ये उर्वशी पुढे बोलताना म्हणाली की,”नावांची तुलना नेहमीच सोशल मीडियावर पाहायला मिळते. अभिनेत्यांपेक्षा क्रिकेटपटूंना जास्त मान दिला जातो. कारण ते अभिनेत्यांपेक्षा जास्त कमावतात. या सगळ्या प्रकाराचा मला खूप त्रास झाला आहे. ते आपल्या देशासाठी खेळतात म्हणून त्यांना जास्त मान मिळतो. मात्र, कलाकार पण भरपूर मेहनत घेत असतात. अशा फालतू तुलना केलेल्या मला मुळीच आवडत नाही.”
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Raut | …तर बेळगाव आणि बंगळुरूमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्याचा निर्णय व्हावा – संजय राऊत
- Urfi Javed | ही कोणती फॅशन!, उर्फी जावेदने गुंडाळली शरीरावर चिकटपट्टी
- Udayanraje Bhosale | शिवरायांचा अपमान करणाऱ्यांवर उदयनराजे कडाडले, आझाद मैदानावर काढणार मोर्चा
- Udayanraje Bhosale | …तर राज्यपालांना टकमक टोकावरून टाकून दिलं असतं – उदयनराजे भोसले
- Udayanraje Bhosale | राज्यपालांच्या वक्तव्यावर उदयनराजे आक्रमक! म्हणाले, “लाजा वाटल्या पाहिजेत, वैयक्तिक स्वार्थासाठी…”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
