Share

लग्न झाल्यानंतर धर्म का बदलावा?; आमिरच्या घटस्फोटानंतर कंगनाचं मोठं वक्तव्य

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री कंगणा रनौत नेहमीच सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असते. कंगना नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अडचणीत सापडते. कंगणा तिच्या बेधडक बोलण्यामुळे नेहमीच चर्चेत राहिली आहे. प्रत्येक गोष्टीवर ती तिचे मत सोशल मिडीयाद्वारे मांडत असते. नुकतेच अभिनेता आमिर खान आणि किरण राव यांच्या घटस्फोटच्या बातमी मुळे अनेकांना धक्का बसला. यावर आता कंगनाने देखील वक्तव्य केलं आहे.

कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरून एक पोस्ट शेअर केली आहे. ‘एक वेळ अशी होती जेव्हा पंजाबमधील कुटुंबांमध्ये एका मुलाला हिंदू तर दुसऱ्या मुलाला शीख धर्माचे पालन करावे लागायचे. तशी परंपरा होती. परंतु अशी परंपरा हिंदू आणि मुस्लिम, मुस्लिम आणि शीख समाजामध्ये नाही. आमिर खान सरांनी घटस्फोट घेतल्याचे मला आश्चर्य वाटले. त्यानंतर असा विचार मनात आला की, हिंदू आणि मुस्लीम आंतरधर्मिय लग्नातून जन्माला आलेली मुलं नेहमीच मुस्लिम का होतात. महिला हिंदू धर्माचे पालन का करू शकत नाही. काळानुसार आपल्याला या गोष्टीही बदलायला हव्यात. ही एक जुनी प्रथा आहे. जर एखाद्या कुटुंबामध्ये हिंदू, जैन, बौद्ध, शीख आणि नास्तिक एकत्र राहू शकतात तर मग मुस्लिम का नाही राहू शकत? एखाद्या मुस्लिम व्यक्तीशी लग्न झाल्यानंतर आपल्याला धर्म का बदलावा लागतो?’,असा प्रश्न तिने यावेळी उपस्थित केला आहे. कंगनाची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे.

kangana ranaut questions inter faith marriage

3 जुलै रोजी आमिर खान आणि किरण राव यांनी आपापल्या घटस्फोटाची घोषणा करून संयुक्त निवेदन केले होते. विधानानुसार, ते यापुढे पती-पत्नी म्हणून राहणार नाहीत, परंतु सह-पालक आणि कुटुंब म्हणून असतील. ‘लगान’ सिनेमाच्या सेटवर आमिर खान आणि किरण रावची पहिली भेट झाली होती. त्यानंतर आमिर आणि किरणने २८ डिसेंबर २००५ सालामध्ये लग्नगाठ बांधली होती. किरण रावशी आमिर खानचं हे दुसरं लग्न होतं.

अमीर खानच्या आगामी ‘लाल सिंग चड्ढा’ या सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. याआधी अमीर खानचा २०१८ मध्ये ठग्स ऑफ हिंदुस्तान हा सिनेमा आला होता परंतु या सिनेमाला जास्त प्रशंसा मिळाली नव्हती.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!