मुंबई: पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकांचे वेध लागल्या पासूनच देशातील राजकीय वातावरण कमालीचं तापलं आहे. तर, भारतीय जनता पक्ष विरुद्ध ममता बॅनर्जी अशी मुख्य लढत पाहायला मिळत आहे. भाजपने ममतादीदींचं वर्चस्व संपवण्यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापासून ते युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस अशी बलाढ्य फौज उतरवली आहे.
या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमधील निवडणूक प्रचार शिगेला पोहोचलेला असतानाच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आता भाजपच्या विरोधात सर्व विरोधी पक्षांना एकत्रित येण्याचं आवाहन केलं आहे. ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासहीत प्रमुख विरोधी पक्षांच्या १५ नेत्यांना पत्रं लिहून हे आवाहन केलं आहे. त्यामुळे विरोधी पक्षांची एकजूट भाजपला पिछाडी देणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
यावरून आजच्या सामना अग्रलेखातून देखील ममतांच्या या आवाहनाला पाठींबा देण्याचे बोलले आहे. ‘राष्ट्रजीवनात सर्वांना स्थान आहे. कोणीही कोणाला नष्ट करण्याचा प्रयत्न करता कामा नये, हीच हिंदुस्थानी संस्कृतीची विशेषता आहे. पण या संस्कृतीवर घाला येत आहे असे आज अनेक प्रमुख लोकांना वाटते. ममता बॅनर्जी यांनी देशभरातील सर्वच विरोधी पक्षांना आवाहन करणारे एक पत्र लिहिले. त्यामागची मूळ भावना हीच आहे. विरोधी ऐक्यासाठी ममता यांनी सगळय़ांना आवाहन केले आहे. ‘लोकशाही रक्षणासाठी एकत्र या’ असे त्यांनी विरोधी नेत्यांना लिहिले आहे. विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये भाजपप्रणीत केंद्र सरकार दडपशाहीचा अवलंब करीत असून लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकजूट होण्याची वेळ आली आहे. तसेच विरोधकांचा एकोपा नसल्यानेच लोकशाहीचे मातेरे झाले आहे. उगाच इंदिरा गांधी किंवा मोदी-शहाप्रणीत भाजपास दोष का द्यायचा? असा सवाल सामानातून करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘अशक्य ते शक्य’ करणारे रजनीकांत हे चित्रपट व जनमनातलेही महानायक – अजित पवार
- उदयनराजेंना दणका, महाविकास आघाडी सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
- ‘गोकुळ’ मध्ये वारं फिरलंय ? प्रकाश आवाडेंनी केली तिसऱ्या आघाडीची घोषणा
- पुण्यात कोरोनाचा उद्रेक ! उद्या कडक निर्बंध लागणार ?
- ‘…जर कोहलीला विश्रांती हवी होती तर त्याने सांगायला हवे’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

