Share

‘तुम्ही ड्रग्जवाल्यांच्या की कारवाईच्या बाजुने आहात हे आधी ठरवा’, फडणवीसांचा ठाकरे सरकारला सवाल

Published On: 

नागपूर : भाजपाचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात केलेले सर्व आरोप खोडून काढत त्यांनी सरकारच्या कामकाजावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, तुम्ही कुणाच्या बाजूने? ड्रग्स वापरणारे, पुरवणारे की त्याविरुद्ध कारवाई करणाऱ्यांच्या बाजूने? हे आधी ठरवा! असा खोचक सवाल फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकाला केला आहे.

पुढे फडणवीस म्हणाले, ईडी, सीबीआय का येते? ती आम्ही नाही आणली. ती येण्याचे कारण म्हणजे तुम्ही ज्या सरकारचे नेतृत्व करत आहात ते भ्रष्ट सरकार आहे. खंडणी उकळणं हाच या सरकारचा अजेंडा आहे. आम्ही लोकशाहीवर विश्वास ठेवणारे लोक आहोत. मात्र एक गोष्ट नक्की आहे. मोदी भ्रष्टाचार खणून काढल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत. भ्रष्टाचार केला असेल त्यांनी घाबरावं, ज्यांनी केला नाही त्यांनी घाबरू नये, असेही फडणवीस म्हणाले.

जोपर्यंत आमच्या शरीरात रक्ताचा शेटचा थेंब आहे, तोपर्यंत महाराष्ट्राचा बंगाल होऊ देणार नाही. जोपर्यंत भाजप जिवंत आहे. तोपर्यंत महाराष्ट्राचा बंगाल होऊ देणार नाही. काय वाटेले ते करू पण महाराष्ट्राचा बंगाल होऊ देणार नाही, असा इशारा फडणवीस यांनी दिला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!